आश्वी येथे महापुरुषांच्या संयुक्त जयंती महोत्सवानिमित्त विचाराचा जागर
◻️ राज्यस्तरीय शोधनिबंध स्पर्धेसाठी हजारो रुपयांची रोख बक्षिसे दिली जाणार
◻️ जयंती समितीचे समन्वयक प्रा. अनिल मुन्तोडे यांची माहिती
◻️ अॅड. अनिल भोसले आणि सरपंच सौ. अलका गायकवाड यांचा समितीकडून गौरव
संगमनेर LIVE (आश्वी) | भगवान गौतम बुध्द व महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती महोत्सव समितीकडून मागील एक दशकापासून महापुरुषांच्या कार्य - कर्तुत्वाला साजेसा ‘जयंती महोत्सव’ संगमनेर तालुक्यातील आश्वी खुर्द येथे साजरा होत आहे. त्याला पंचक्रोशीतील नागरीकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
सोमवारी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीदिनी (१४ एप्रिल) रोजी आश्वी खुर्दच्या सरपंच सौ. अलका गायकवाड यांनी या महोत्सवाचे ध्वजारोहण करुन महोत्सवाचे उदघाटन केले. यावेळी उत्सव समितीचे सदस्य आणि महामानवाच्या विचारांचे विविध क्षेत्रातील अनुयायी सकाळपासून बाबासाहेब आंबेडकरांना जयंतीनिमित्त अभिवादन करण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना राजेंद्र मुन्तोडे यांनी जयंती समितीच्या कार्याचा आढावा व पुढील कार्यक्रमाविषयी माहिती दिली.
जयंती समितीचे प्रमुख समन्वयक प्रा. अनिल मुन्तोडे यांनी भगवान गौतम बुद्ध व विश्वरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबविल्या जात असल्याचे सांगून यावर्षी राज्यातील सामाजिक विषयावर राज्यस्तरीय शोधनिबंध स्पर्धा आयोजित करण्यात आल्याची माहिती देऊन यामध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले. तसेच आश्वी येथे १२ मे रोजी होणाऱ्या बुद्ध पौर्णिमे रोजी आयोजित सांगता कार्यक्रमप्रसंगी राज्यातील नामवंत संशोधक भेट देणार असल्याची माहिती देखील त्यांनी दिली.
प्रा. मुन्तोडे पुढे म्हणाले, “केवळ माझ्या नावाचा जयजयकार करण्यापेक्षा माझे अपूर्ण राहिलेले काम पूर्ण करा, त्यासाठी तुम्ही प्राणाची बाजी लावा.” या बाबासाहेबांच्या विचाराला आधार बनवून समिती वाटचाल करीत आहे. यासाठी एक महिनाभर महामानवाच्या विचारांचा जागर करण्याचा कार्यक्रम जयंती समितीच्या वतीने आखण्यात आला आहे. यामध्ये आश्वी खुर्द सह पंचक्रोशीतील नागरीकांनी सहभागी व्हावे असे आवाहन केले.
पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील कारखान्याच्या संचालक पदी बिनविरोध निवड झाल्यामुळे गावचे भुमिपुत्र अॅड. अनिल भोसले तसेच गावच्या पहिल्या महिला लोकनियुक्त सरपंच म्हणून सौ. अलका गायकवाड या निवडून आल्यामुळे त्याचां यावेळी सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी बाबासाहेब भवर, सोपान सोनवणे, संजय भोसले, आशा मुन्तोडे, जगदीश मुन्तोडे, बापूसाहेब भवर, एकनाथ मुन्तोडे, संजय देशमुख, प्रा. देविदास वाळेकर, संजय खरात, विकास गायकवाड, संतोष भडकवाड, भाऊसाहेब मुन्तोडे, बबन मुन्तोडे, भाऊसाहेब गाडे, श्रीरंग कदम, कैलास पगारे, बंडू मुन्तोडे, कैलास मुन्तोडे, रावसाहेब मुन्तोडे, आकाश मुन्तोडे, सिद्धार्थ मुन्तोडे, अर्जुन मुन्तोडे, गौरव मुन्तोडे, प्रतीक मुन्तोडे, शकुंतला जाधव, अलिशा मुन्तोडे, वर्षा मुन्तोडे, संगिता मुन्तोडे, साधना मुन्तोडे, रेणुका मुन्तोडे, साक्षी मुन्तोडे, श्रेया मुन्तोडे आदि मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दरम्यान या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन सुशिल मुन्तोडे यांनी केले. तर, आभार बबन मुन्तोडे यांनी मानले. उपस्थिताना यावेळी मिठाईचे वाटप देखील करण्यात आले.
राज्यस्तरीय शोधनिबंध स्पर्धाचे आयोजन..
संयुक्त जयंती महोत्सव समितीकडून राज्यस्तरीय शोधनिबंध स्पर्धाचे आयोजन करण्यात आले असून ही स्पर्धा सर्वासाठी खुली आहे. शोधनिबंध पाठवण्याची अतिंम दि. ३० एप्रिल २०२५ आहे. निकाल व बक्षीस वितरण दि. १२ मे बुध्द पोर्णिमेच्या दिवशी होणार आहे. तर, शोध निबंध 9021097597 ; 9325487271 या मोबाईल क्रमांकावर किंवा anilmuntode@gmail.com या मेल आयडी वर पाठवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.