सहकारमहर्षी थोरात कारखान्याला वीज निर्मितीसाठी ‘ राष्ट्रीय पुरस्कार’

संगमनेर Live
0
सहकारमहर्षी थोरात कारखान्याला वीज निर्मितीसाठी ‘ राष्ट्रीय पुरस्कार’

◻️ सहकार महर्षी साखर कारखान्याचा सलग दुसऱ्या वर्षी गौरव 

संगमनेर LIVE | काँग्रेसचे जेष्ठ नेते आणि माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली सहकारासाठी आदर्श ठरलेल्या सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याला सलग दुसऱ्या वर्षी वीजनिर्मिती बद्दल सातत्यपूर्ण उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दलचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे.

पुणे, बाणेर येथे नॅशनल को जनरेशन फेडरेशनच्या वतीने आयोजित कार्यक्रमात हा पुरस्कार ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या हस्ते कारखान्याचे चेअरमन बाबासाहेब ओहोळ यांनी स्वीकारला. यावेळी सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील, जयप्रकाश दांडेगावकर, राज्य साखर संघाचे अध्यक्ष पी. एन. पाटील, प्रतापराव पवार, राजेंद्र नागवडे, विवेक कोल्हे, तर थोरात कारखान्याच्या वतीने कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर, चीफ इंजिनियर नवनाथ गडाख, चीफ केमिस्ट संजय पाटील, अशोक मुटकुळे, भारत देशमुख, भाऊसाहेब खर्डे आदी उपस्थित होते.

जेष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली कारखान्याने उभारलेला नवीन ५५०० मे टन क्षमता व ३० मेगा वॅट वीज निर्मितीचा प्रकल्प हा दिशादर्शक ठरला आहे. प्रतिकूल परिस्थिती ही कारखान्याने शेतकरी सभासद व ऊस उत्पादक यांचे हित जपताना कायम उच्चांची भाव दिला आहे. याचबरोबर मागील हंगामात ८ लाख २५ हजार ९९४ मे टनाचे गाळप केले आहे. 

मागील वर्षी ७ कोटी ८९ लाख युनिटची वीज निर्मिती केली आहे. यातून ५ कोटी २८ लाख ९३ हजार युनिट ही वीज निर्यात केली आहे. यातून कारखान्याला ३८ कोटी ७१ लाख रुपये नफा झाला आहे. कारखान्याने केलेल्या या सातत्यपूर्ण उत्कृष्ट कामगिरीबद्दल राष्ट्रीय पातळीवरील कन्सिस्टंट परफॉर्मन्स (सातत्यपूर्ण कामगिरी) बदलता राष्ट्रीय पुरस्काराने सन्मान करण्यात आला आहे. मागील वर्षीही थोरात कारखान्याला या पुरस्काराने दिल्ली येथे गौरविण्यात आले होते.

यावेळी बोलताना खासदार पवार म्हणाले की, सहकार क्षेत्राने महाराष्ट्राच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेला मजबुती दिली आहे. सहकार टिकला पाहिजे तो वाढला पाहिजे. सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांनी सहकारामध्ये आदर्श तत्व रुजवली आणि याच तत्वावर लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेरचा सहकार हा राज्यासाठी दिशादर्शक ठरणारा आहे. आगामी काळात साखर उद्योगात अनेक आव्हाने असून ए आय तंत्रज्ञानाचा वापर करून हेक्टरी उत्पादन वाढवण्यासाठी साखर कारखान्यांच्या कृषी विभागाने काम करावे असे आवाहन त्यांनी केले.

याप्रसंगी सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील, पी. एन. पाटील, जयप्रकाश दांडेगावकर आदिनी मनोगत व्यक्त केली.

कारखान्याचे चेअरमन बाबा ओहोळ म्हणाले की, थोरात सहकारी साखर कारखान्याने कायम तालुक्याचे हृदय म्हणून काम केले आहे. लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली गुणवत्तापूर्ण उत्कृष्ट कामगिरीमुळे राज्य व राष्ट्रीय पातळीवरील विविध पुरस्कार या कारखान्याला मिळाले आहे. हे पुरस्कार सांघिक कामाचे यश असल्याचे सांगितले.

दरम्यान कारखान्याला हा पुरस्कार मिळाल्याबद्दल कारखान्याचे मार्गदर्शक बाळासाहेब थोरात, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, आमदार सत्यजित तांबे, सौ. दुर्गाताई तांबे, ॲड. माधवराव कानवडे, रणजीतसिंह देशमुख, सुधाकर जोशी, शंकरराव खेमनर, संपतराव डोंगरे, रामहरी कातोरे, हौशीराम सोनवणे, राजेंद्र गुंजाळ, बाजीराव खेमनर, इंद्रजीत थोरात, डॉ जयश्रीताई थोरात, संतोष हासे, सर्व संचालकानी अभिनंदन केले.
Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !