वीट व्यवसायाला विमा योजना लागू करण्यास पाठपुरावा करु - आ. अमोल खताळ
◻️ संत गोरोबाकाका पुण्यतिथी निमित्त महाआरती मंगलमय वातावरण संपन्न
संगमनेर LIVE | कुंभार समाजाच्या वीट व्यवसायास प्रदूषणाची अट सरकारने रद्द केली आहे. त्याचप्रमाणे पुढील काळात बिगरशेतीची अट रद्द करून अवकाळी पावसाने वीट व्यवसायाचे नुकसान झाल्यास विमा योजना लागू करण्यासाठी आपण शासन दरबारी पाठपुरावा करणार. असल्याची ग्वाही आमदार अमोल खताळ यांनी दिली.
संत गोरोबाकाका पुण्यतिथी निमित्त कुंभार गल्लीतील गोरोबाकाका मंदिरात आमदार अमोल खताळ यांच्या हस्ते महा आरती करून अभिवादन करण्यात आले. यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
याप्रसंगी कैलास वाकचौरे, मच्छिंद्र जोर्वेकर, राजेंद्र जोर्वेकर, दिनेश फटांगरे, संतोष जोर्वेकर दिलीप वाकचौरे, मधू नालकर, अनिल जोर्वेकर, पंकज जोर्वेकर बाळासाहेब जोर्वेकर, संजय वाकचौरे, निलेश खुळे, रामदास मेहेत्रे, शशिकांत घोलप, सचिन पावबाके, सुभाष जोर्वेकर, महेंद्र वांकचौरे, नंदू जोर्वेकर, संकेत खुळे, अजित भालेराव, योगेश सूर्यवशी, जालिंदर जोर्वेकर, अभिराज वाकचौरे आदि यावेळी उपस्थित होते.
आमदार खताळ म्हणाले की, कुंभार समाजातील तरुण पिढीला दिशा देण्याचे काम संत गोरोबाकाका यांनी केले. त्यामुळे त्यांचे विचार व संस्कार प्रत्येक समाजबांधवांनी आपल्या आचरणामध्ये आणावे. कुंभार समाजबांधवांचे जे काही प्रलंबित प्रश्न आहेत ते सोडवण्यासाठी आपण शासनदरबारी पाठपुरावा करू असाही विश्वास आमदार खताळ यांनी कुंभार समाज बांधवांना दिला.
दरम्यान यावेळी कुंभारसमाजाच्या वतीने माजी नगरसेवक कैलास वाकचौरे आणि कुंभार समाजाचे अध्यक्ष मच्छिंद्र जोर्वेकर आणि उपाध्यक्ष राजेंद्र वाकचौरे यांनी आ. अमोल खताळ यांचा सन्मान केला