अहिल्यानगर येथे जैन समाजासाठी शासकीय योजना महासंमेलनाचे आयोजन
◻️ जैन श्रावक संघाचे सदस्य योगेश रातडीया यांची माहिती
◻️ श्री ऑल इंडिया श्वेतांबर स्थानक, जैन कॉन्फरन्सचा उपक्रम
संगमनेर LIVE (आश्वी) | चतुर्थ झोन अहिल्यानगर जिल्ह्यातील सर्व जैन संघटनांचा वतीने बुधवार, २३ एप्रिल २०२५ सकाळी १० वाजता धार्मिक परीक्षा बोर्ड, अहिल्यानगर येथे जैन समाजाच्या अल्पसंख्याक दर्जा व त्याअंतर्गत मिळणाऱ्या शासकीय योजनांबाबत विशेष महासंमेलन आयोजन करण्यात आले असून या संमेलनासाठी जैन बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे. असे आवाहन आश्वी बुद्रुक जैन श्रावक संघाचे सदस्य तथा सामाजिक कार्यकर्ते योगेश रातडीया यांनी केले आहे.
या महासंमेलनात मार्गदर्शन करण्यासाठी जैन अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाचे राज्य अध्यक्ष ना. ललित गांधी आणि अखिल भारतीय जैन कॉन्फरन्स अल्पसंख्याक योजना विभागाचे अध्यक्ष ना. कांतीकुमार जैन हे उपस्थित राहणार आहेत.
यावेळी शासनाच्या विद्यार्थ्यी शिष्यवृत्ती योजना, महिला व युवकांसाठी स्वयं रोजगार कर्ज योजना, अनुदान व इतर कर्ज योजना, प्रधानमंत्री आवास योजना (घरकुल), कौशल्य विकास योजना, प्राचीन तीर्थ व ग्रंथांचे संरक्षण, जैन शाळा अर्थ सहाय्य योजना, परदेशात शिक्षणासाठी शैक्षणिक कर्ज आदि बाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
दरम्यान या सर्व योजनांचा लाभ घेण्यासाठी आवश्यक फॉर्म या संमेलन ठिकाणीच वितरित केले जाणार आहेत. लाभ मिळवण्यासाठी फॉर्म भरून सादर करणे अनिवार्य आहे. त्यामुळे सर्व लाभार्थ्यानी आपले शैक्षणिक, आर्थिक व इतर कागदपत्रांसह उपस्थित राहावे असे आवाहन अयोजकांनी केले आहे.