पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा दिव्यांग बांधवांकडून जाहीर निषेध
◻️ नागरिकांचे बलिदान केंद्र सरकार व्यर्थ जाऊ देणार नाही - आमदार अमोल खताळ
◻️ संगमनेर शहरात जोरदार घोषणाबाजी करत केला जाहीर निषेध
संगमनेर LIVE | जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे हिंदू पर्यटकांवर दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्याच्या विरोधात संगमनेर शहर आणि तालुक्यातील दिव्यांग बांधवांनी जोरदार घोषणा बाजी करत जाहीर निषेध व्यक्त केला.
संगमनेर येथील शासकीय विश्रामगृह येथे दिव्यांग सेनेचे जिल्हाध्यक्ष जालिंदर लहामगे यांनी दिव्यांग बांधवांना एकत्रित करत जम्मू काश्मीरमध्ये हिंदू पर्यटकांवर झालेल्या या हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध व्यक्त केला. या हल्ल्यात प्राण गमावलेल्या पर्यटकांप्रती सद्भावना व्यक्त केली.
यावेळी दिव्यांग बांधवांनी संपूर्ण देशाला एकतेचा अन देशभक्तीचा संदेश दिला. दहशतवाद्यांच्या कृत्यांचा निषेध करत सर्व देशवासीयांना सजग व सशक्त राहण्याचे आवाहन दिव्यांग सहाय्य सेनेचे जिल्हाध्यक्ष जालिंदर लहामगे, महिला आघाडी तालुकाध्यक्ष पौर्णिमा आढाव शिवाजी खुळे, अविनाश ढमाले, राजेंद्र ढमाले, विष्णू गणोरे, पुरुषोत्तम जोशी यांच्यासह उपस्थित असलेल्या सर्व दिव्यांग बांधवांनी केले.
जम्मू काश्मीर मधील पेलगाम येथील हल्ल्याच्या निषेधार्थ शासकीय विश्राम गृहावर दिव्यांग बांधव आंदोलन करत होते. त्यावेळी आमदार अमोल खताळ हे शासकीय विश्रामगृहात आले असता त्यांनी दिव्यांग बांधवांना पाहताच आपली गाडी थांबवली अन दिव्यांग बांधवांमध्ये सहभागी होऊन त्यांच्या भावना जाणून घेतल्या.
जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथील ज्या दहशतवाद्यांनी हिंदू पर्यटकावर हल्ला केला. हा हल्ला घडवून आणणाऱ्या पाकिस्तानी दहशतवाद्यांचा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा हे नक्कीच खात्मा करतील यात शंका नाही. परंतु येथून पुढे यासारखे दहशतवादी हल्ले होणार नाही यासाठी सर्वांनी एकत्रित येण्याची नितांत गरज आहे. हल्लेखोरांची कधीही माफी होऊ शकत नाही. देशाची एकता, अखंडता आणि सर्वसामान्य नागरिकांचे बलिदान सरकार व्यर्थ जाऊ देणार नाही. असे आश्वासन आमदार अमोल खताळ यांनी दिले.