स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीत 'शत प्रतिशत भाजप'साठी तयारी करा
◻️ मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे कार्यकर्त्याना आवाहन
◻️ मुख्यमंत्री फडणवीस यांनी दूरदृष्य प्रणालीद्वारे साधला संवाद
◻️ भाजप पक्षाचा स्थापना दिन व दिडकोटी सदस्य संख्या पूर्ण केल्याचा आनंदोत्स्व साजरा
संगमनेर LIVE (राहाता) | विकास आणि विचारांच्या आधारावार भारतीय जनता पक्षाने देशात आणि राज्यात सता स्थापन केली आहे. विधानसभा जिकंली आता स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीत 'शत प्रतिशत भाजप' साठी तयारी करा, प्रत्येक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यानी बुथ स्तरावर संघटना अधिक मजबूत करण्याचे आवाहन जलसंपदा तथा पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.
भारतीय जनता पक्षाच्या स्थापना दिवसाच्या निमिताने तसेच पक्षाने दिडकोटी सदस्य संख्या पूर्ण केल्याचा आनंदोत्स्व शिर्डी मतदार संघातील पदाधिकरी आणि कार्यकर्त्यांच्या वतीने मंत्री विखे पाटील यांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला. यानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील कार्यकर्त्याशी दूरदृष्य प्रणालीद्वारे साधलेल्या संवादाचे प्रक्षेपण दाखविण्यात आले.
आपल्या भाषणात मंत्री विखे पाटील म्हणाले की, पक्षातील प्रत्येक तोलामोलाच्या कार्यकर्त्यानी विधानसभा निवडणुकीत घेतलेल्या मेहनतीमुळे राज्यात पुन्हा महायुतीची सता येवू शकली. राज्यातील जनतेचा मिळालेला जनाधार खूप ऐतिहसिक असल्याचे त्यांनी सांगितले.
सदस्य नोंदणी अभियानात राज्यात दिड कोटी सदस्य करताना शिर्डी मतदार संघातील कार्यकर्त्यांनी ७० हजार सदस्य नोंदणी करण्यात दिलेल्या योगदाना बद्दल अभिनंदन करून विखे पाटील म्हणाले की विधानसभा निवडणुकीत सर्वानी घेतलेल्या परीश्रमामुळे जिल्हयात महायुतीला मोठे यश मिळू शकले.
महायुती सरकारने योजनांच्या माध्यमातून लोकांचा विश्वास संपादन केला. सुरू केलेली एकही योजना बंद होवू दिलेली नाही. महाविकास आघाडी कडून काही आरोप होत असले तरी भाजपाच्या कार्यकर्त्यानी आत्मविश्वासाने निवडणुकीत आघाडीच्या विरोधात केलेली लढाई महत्वाची ठरली.
विश्वनेते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारने ३७० कलम हटविण्याचा महत्वपूर्ण निर्णय केला. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी वक्फ बोर्डच्या संदर्भात सुधारणेचे विधेयक मांडून नवी सुरूवात केली असल्याचे सांगून या निर्णयाबद्दल त्यांनी पंतप्रधान आणि गृहमंत्र्याचे अभिनंदन केले.
भारतीय जनता पक्षाचा स्थापना दिवसाच्या निमिताने मंत्री विखे पाटील यांनी आपल्या निवासस्थानी पक्षाचा झेंडा फडकावला. मतदार संघात प्रत्येक पदाधिकरी आणि कार्यकर्त्यानी ध्वज फडकावून कुटूबांसह सेल्फी काढले.
श्रीराम नवमी आणि पक्षाचा स्थापना दिवस एकाच दिवशी आल्याने भाजपाच्या कार्यकर्त्यामध्ये मोठा उत्साह पाहायला मिळाला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे दूरदृष्य प्रणालीद्वारे भाषण ऐकण्यासाठी स्क्रीनची व्यवस्था करण्यात आली होती.
कार्यक्रमास सभापती ज्ञानेश्वर गोंदकर, भाजपाच्या ओबीसी मोर्चाचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब गाडेकर, महीला मोर्चाच्या कांचनताई मांढरे, तालुका अध्यक्ष दिपक रोहोम, शोभाताई घोरपडे, कैलास सदाफळ, मुकूंदराव सदाफळ, किरण बोराडे, अशोक पवार, साहेबराव निधाने, नितीन कापसे, नंदकुमार जेजूरकर, सुभाष वहाडणे, राजेंद्र वाबळे, सतिष बावके यांच्यासह सर्व पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आभासी दूरदृष्य प्रणालीद्वारे संवाद साधताना कार्यकर्त्याच्या मेहनतीमुळे राज्यात पुन्हा मुख्यमंत्री पदावर काम करण्याची संधी मिळाल्याबद्दल ॠण व्यक्त करून भारतीय जनता पक्षाच्या विस्तारासाठी अनेक नेत्यांचे योगदान महत्वाचे राहीले. यामध्ये अहील्यानगर जिल्ह्यातील स्व. सूर्यभान पाटील वहाडणे आणि ना. स. फरादे यांचा त्यांनी आवर्जून उल्लेख केला.