संगमनेरला श्रीराम मंदिरात राम जन्मोत्सव उत्साहात साजरा
◻️ आमदार अमोल खताळ व सौ. निलम खाताळ यांच्या हस्ते महाआरती
◻️ रामनवमी निमित्त सकाळपासून मंदिरात दर्शनासाठी राम भक्ताची गर्दी
संगमनेर शहरातील चंद्रशेखर चौकात असणाऱ्या श्रीराम मंदिरामध्ये रामनवमी निमित्त श्रीरामजन्मोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. सकाळपासून या मंदिरात रामभक्तांनी दर्शनासाठी एकच गर्दी केली होती. आमदार अमोल खताळ यांच्या हस्ते सर्वप्रथम प्रभु राम, लक्ष्मण आणि माता सीता यांना पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर आमदार खताळ आणि त्यांच्या पत्नीच्या हस्ते प्रभू रामचंद्रांची आरती करण्यात आली. यानंतर त्यांनी तमाम संगमनेरकरांना रामनवमीच्या शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी “प्रभू रामचंद्र की जय” “सिया वर रामचंद्र की जय” असा जयघोषामुळे परिसर दुमदुमून गेला होता. यावेळी रामजन्मोत्सवाचा पाळणा आमदार खताळ आणि सौ. खताळ यांच्यासह महिलांनी हलविला. यावेळी अनेक महिलांनी ओव्या गाऊन राम जन्मोत्सव साजरा केला.
दरम्यान या सोहळ्यासाठी भाजपचे श्रीराम गणपुले, संघाचे सुभाष कोथंबिरे, कमलाकर भालेकर, योगराज परदेशी, अक्षय थोरात, अनिकेत चांगले, मुन्ना जोशी, राम वामन, विनायक तांबे, शुभम लहामगे, उपासनी, योगेश मांगलकर, वरद बागुल, शुभम डावखरे, गिरीश मेंद्रे, विलास परदेशी, चेतन तारे, अजित खेगले, तुषार गीते, यांच्यासह रामभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.
संगमनेर शहरातील उपासनी गल्ली मध्ये असणाऱ्या उपासनी बंधूंच्या काळाराम मंदिरात जाऊन आमदार खताळ आणि त्यांच्या पत्नीच्या हस्ते पूजा करून महाआरती करण्यात आली. यावेळी उपासनी परिवाराच्या वतीने वैभव उपासनी, विशाल उपासनी, सुहास उपासनी, ॲड. अजिंक्य उपासनी, प्रवीण कर्पे, अक्षय कर्पे, ॲड. गणेश पगडाल, निलेश उपासनी, विजय बेल्हेकर उपस्थित होते.
श्रीराम नवमीच्या उत्सवानिमित्त चंद्रशेखर चौकातील श्रीराम मंदिर व मोठा मारुती मंदिर परिसरामध्ये विघ्नेशाराजे किशोर आहेर या शाळकरी मुलीने रामायणातील अनेक प्रतिकृती रेखाटल्या होत्या. त्या सर्व कलाकृतीची पाहणी आमदार अमोल खताळ यांनी करून कौतुक केले.