मांचीहिल येथील ज्ञानगंगा विद्यानिकेतन शाळेचे मंथन स्पर्धेत सुयश
◻️ इयत्ता पहिली, दुसरी, तिसरीच्या विद्यार्थ्यानी राज्य, जिल्हा आणि केंद्र पातळीवर मिळवले दैदिप्यमान यश
संगमनेर LIVE | संगमनेर तालुक्यातील शैक्षणिक क्षेत्रात नावलौकिक असलेल्या मांचीहिल येथील ज्ञानगंगा विद्यानिकेतन शाळेतील विद्यार्थ्यानी मंथन शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये राज्य, जिल्हा आणि केंद्र पातळीवर गुणवत्तापूर्ण यश संपादन केले.
यामध्ये इयत्ता पहिलीतील आराध्या सोमनाथ वऱ्हाडे ही जिल्ह्यात सातवी आणि आश्वी केंद्रात दुसरी आली. इयत्ता दुसरीचा हर्षवर्धन संतोष भुसाळ हा जिल्ह्यात सातवा आणि आश्वी केंद्रात पहिला आला. इयत्ता तिसरीचा शौर्य भाऊसाहेब खेमनर हा केंद्रात दुसरा, कार्तिक जालिंदर जोंधळे केंद्रात तिसरा, प्रतीक दत्ता शिंदे केंद्रात पाचवा, तसेच इयत्ता चौथीतील अर्णव देविदास वाळेकर केंद्रात चौथा, ज्ञानहर्षा सागर वाघमारे केंद्रात पाचवी, स्वरा संतोष भुसाळ केंद्रात सातवी आली.
त्याचबरोबर इयत्ता सहावीतील सई अजय कुलकर्णी ही राज्यात ३९ वी आणि केंद्रात पहिली, आराध्या मच्छिंद्र पुणेकर ही राज्यात ५६ वी आणि केंद्रात दुसरी, इयत्ता सातवीतील श्रेणिक श्रीराम गुंड हा राज्यात ६३ वा आणि केंद्रात पहिला, महेश किसन होलगीर हा राज्यात ६४ आणि केंद्रात दुसरा, इयत्ता आठवीचा प्रसाद कोटकर राज्यात २९ वा आणि आश्वी केंद्रात पहिला आला.
दरम्यान या सर्व यशस्वी विद्यार्थी आणि शिक्षकांचे संस्थाप्रमुख अॅड. शाळीग्राम होडगर, प्राचार्य विजय पिसे, मुख्याध्यापिका योगिता दुकळे, विभाग प्रमुख नितीन गिते, शीतल सांबरे यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.