पाझर तलाव दुरुस्तीचे काम लवकरात लवकर पूर्ण करा - आमदार अमोल खताळ
◻️ वेल्हाळे येथील पाझर तलाव कामाचा आमदार खातळ यांच्या हस्ते शुभारंभ
संगमनेर LIVE | निळवंडे डाव्या कालव्याचे पाणी वेल्हाळेच्या पाझर तलावात सोडले तर या भागातील पाण्याची समस्या दूर होण्यास मदत होईल. अशी मागणी या भागातील ग्रामस्थांनी आपल्याकडे केली आहे. त्यानुसार या पाझर तलाव दुरुस्तीचे काम जलसंधारण विभागाच्या अधिकाऱ्यांनी लवकरात लवकर पूर्ण करावे असे निर्देश आ. अमोल खताळ यांनी जलसंधारण विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले.
संगमनेर तालुक्यातील वेल्हाळे येथील पाझर तलाव दुरुस्ती कामाचा शुभारंभ आमदार अमोल खताळ यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. सरपंच विष्णू आव्हाड, जलसंधारण उपअभियंता कपिल बिडगर, किशोर भांड, अशोक ननावरे, बाळासाहेब जेडगुले, सतीश सोलाट, शांताराम सोनवणे, भानुदास सोनवणे, ज्ञानेश्वर सोनवणे, रोहन भागवत, गणेश सोनवणे, योगेश सोनवणे, शंकर भांड, हरिभाऊ भांड, गोकुळ सोनवणे आदि यावेळी उपस्थित होते.
आमदार खताळ यांनी येथून मागील कालावधीत उन्हाळ्यात पाणी होते का असा सवाल करत शेतीला पाणी मिळावे तसेच पाणीटंचाई दूर व्हावी यासाठी जलसंपदा तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या विशेष प्रयत्नातून उन्हाळ्याच्या कालावधीत शेतीसाठी प्रवरानदी पात्रातून तसेच निळवंडे डाव्या व उजव्या कालव्यातून पाणी सुरू केले.
या पाझर तलावात जर कोणाचे अतिक्रमण असेल तर ते काढून घ्यावे. भविष्यात तुम्हालाच या पाझर तलावातुन पाणी उपलब्ध होणार आहे. यासाठी प्रत्येकाने समन्वयातून मार्ग काढून अधिकाऱ्याना तुम्ही सर्वानी सहकार्य करावे आणि या पुढील काळात वेल्हाळे गावात पाण्याची समस्या निर्माण होणार नाही. यासाठी या पाझर तलावाची जलसंधारण विभागाच्या अधिकाऱ्यानी अंदाज पत्रकानुसार दुरुस्ती करावी असे निर्देश दिले.
वेल्हाळे गावाच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणात निधी दिला असून येथून पुढेही पालकमंत्री राधाकृष्ण विख आणि माझ्या माध्यमातून निधीची कुठली ही कमतरता भासू दिली जाणार नसल्याची ग्वाही त्यांनी दिली.
वेल्हाळे गावासाठी आमदार अमोल खताळ यांच्या माध्यमातून अवघ्या सहाच महिन्यात ६५ लाख रुपयांचा निधी मिळालेला आहे. या निधीच्या माध्यमातून पाझर तलावाची दुरुस्ती तसेच गावातील विकास कामे कामे केली जाणार असल्याचे वेल्हाळेचे महायुतीचे युवानेते किशोर भांड यांनी सांगितले.