सामाजिक भवनासाठी जागा उपलब्ध करा, मी निधी देतो - आमदार अमोल खताळ
◻️ करुले येथे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी
संगमनेर LIVE | भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भवन बांधकामासाठी राज्याचे समाज कल्याण मंत्री संजय शिरसाठ यांनी निधी देण्याचे मान्य केले आहे. तुम्ही जागा उपलब्ध करून द्या. तुमच्या गावात डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक भवन उभारण्यासाठी भरीव निधी दिला जाईल. अशी ग्वाही आमदारा अमोल खताळ यांनी दिली.
संगमनेर तालुक्यातील करूले येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्ताने आयोजित कार्यक्रमात आमदार अमोल खताळ बोलत होते. यावेळी आमदार खताळ यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
याप्रसंगी व्यासपीठावर राजेंद्र आहेर, साहेबराव आखाडे, साहेबराव गायकवाड, नवनाथ गायकवाड, नानासाहेब गायकवाड, सोमनाथ गायकवाड, आशिष गायकवाड, योगेज आहेर, अनिल बोऱ्हाडे, प्रविण गायकवाड, अमोल गायकवाड, अजय गायकवाड, सतीश गायकवाड आदि मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आ. अमोल खताळ म्हणाले की, संगमनेर तालुक्यातील अनेक भीमसैनिकांनी आपल्याकडे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक भावनाची मागणी केली आहे. यासाठी राज्याचे समाज कल्याण मंत्री संजय शिरसाट यांच्याकडे निधीची मागणी केली होती, ती त्यांनी मागणी मान्य केली आहे. त्यामुळे ज्या ज्या गावात जागा उपलब्ध होईल त्या ठिकाणी सामाजिक भवन उभे करून देण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्याची ग्वाही आमदार खताळ यांनी दिली.