भारतीय ज्ञान परंपरा जगश्रेष्ठचं, तिचा प्रचार व प्रसार करा - डॉ. सुधीर तांबे

संगमनेर Live
0
भारतीय ज्ञान परंपरा जगश्रेष्ठचं, तिचा प्रचार व प्रसार करा - डॉ. सुधीर तांबे

◻️ सहकार महर्षी महाविद्यालयात राष्ट्रीय चर्चा सत्राचे आयोजन 

संगमनेर LIVE | भारतीय शैक्षणिक परंपरा ही खूप प्राचीन आहे. जगात भारताचे जे स्थान प्राप्त झालेले आहेत त्यांचे सर्वस्वी श्रेय हे भारतीय महान  शैक्षणिक परंपरेला द्यावे लागेल. नालंदा व तक्षशिला सारखे विद्यापीठामध्ये जगाभरातून विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी येत असे. शिक्षण प्राप्ती नंतर प्रत्येक विद्यार्थी हा आपल्या क्षेत्रामध्ये उंच स्थानावर असल्याचे अपणास बघण्यास मिळते. आजही आधुनिक शिक्षण पद्धती मध्ये भारतीय ज्ञान परंपरेचे महत्वाचे स्रोत ‘वेद’ महत्वाची भूमिका बजावतानी दिसतात. असे मत सह्याद्री बहुजन विद्या प्रसारक समाज संस्थाचे चेअरमन डॉ. सुधीर तांबे यांनी व्यक्त केले.

सहकार महर्षी भाऊसाहेब संतुजी थोरात कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयामध्ये दिनांक ४ व ५ एप्रिल २०२५ रोजी बायोइंफॉर्मेटिक्स, भारतीय ज्ञान प्रणाली, कुत्रिम बुद्धिमत्ता व विकसित भारत या विषयावर दोन दिवसीय आंतरविद्याशाखीय राष्ट्रीय चर्चा सत्राचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते.

चर्चा सत्राच्या उद्घाटन समारंभासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे उपकुलगुरू प्रो. डॉ. पराग कालकर हे उपस्थित होते. त्यांनी विकसित भारत व कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) या विषयावर आपल्या ओघवत्या शैली मध्ये सविस्तर मार्गदर्शन केले. वाणिज्य व व्यस्थापन विभागांतर्गत डॉ. दिनेश भक्कड यांनी ‘विकसित भारत २०४७ ‘ या विषयावर मार्गदर्शन केले. 

डॉ. रवींद्र जाधव यांनी ‘कृत्रिम बुद्धिमत्ता व शाश्वत विकासातील अडथाळे या विषयवार  सटीक विश्लेषण केले. तसेच प्रा. डॉ. भाऊसाहेब रणपिसे हे व्यावसायिक कौशल्य विकास व युवकांची काम करण्याची मानसिकता याबाबत आपले विचार मांडले. वाणिज्य व व्यस्थापन विभागांतर्गत एकूण ८० शोध निबंध प्राप्त  झाले.

विज्ञान शाखा अंतर्गत डॉ. भागवत चावरे यांनी भारतीय ज्ञान प्रणाली’ विषयावर प्राध्यापक, शोधार्थी व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. डॉ. राजेंद्र शिरसाठ पर्यावरणपूरक रसायनशास्त्र विषयावर आपले विचार व्यक्त केले. निरोगी आयुष्य जगण्यासाठी प्रदूषण मुक्त वातावरणाची आवश्यकता असल्याचे विचार मांडले. 

डॉ. मनोज पाटील हे बायोइंफॉर्मेटिक्स विषयवार मार्गदर्शन करतानी म्हटले की, आजचे युग हे संगणकाचे युग आहे या संगणकामध्ये दररोज नवनवीन तंत्रज्ञान विकसित होत आहे जीवविज्ञान सारख्या विषयात सूक्ष्म अध्ययन करण्यासाठी संगणकाचा वापर मोठ्या प्रमाणात होत आहेत, भारता सारख्या बलाढ्य लोकसंख्या असलेल्या देशात बायोइंफॉर्मेटिक्स वरदान ठरत आहेत त्यामुळे कोविड सारख्या घातक विषाणू वर मानवाने विजय प्राप्त केला. 

आधुनिक युगात बायोइंफॉर्मेटिक्स महत्व वाढत चालेले आहे. डॉ. अभिजित कुलकर्णी हे जैवविविधता आणि जलसंवर्धन विषयावर आपले विच्गर मांडले. विज्ञान शाखा अंतर्गत ९० शोध निबंध प्राप्त झाले.

दरम्यान या चर्चा सत्रासाठी सह्याद्री बहुजन विद्या प्रसारक समाज संस्थेचेचे  सेक्रेटरी ॲड. सुमंत कोल्हे, सह सेक्रेटरी आचार्य बी. आर. गवांदे, माविद्यालयाचे प्र. प्राचार्य प्रो. डॉ. बाळासाहेब वाघ, उप प्राचार्य डॉ. विलास कोल्हे, लक्ष्मण घायवट वाणिज्य विभागप्रमुख प्रो. विजयकुमार बैरागी, प्रशासकीय अधिकारी गोरक्षनाथ पानसरे चर्चासत्र समन्वयक प्रा. गणेश थोरात, महाविद्यालयातील प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते.
Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !