लवकरचं महामानवाचा पूर्णाकृती पुतळा उभारणार - आ. अमोल खताळ
◻️ संगमनेर येथे पालकमंत्री विखे पाटील यांच्याकडून जयंतीनिमित्त डॉ. आंबेडकर यांना अभिवादन
◻️ डॉ. आंबेडकर यांच्या राज्यघटनेमुळे माझ्यासारखा शेतकऱ्याचा मुलगा आमदार झाल्याचे खताळ यानी केले स्पष्ट
संगमनेर LIVE | संगमनेर शहरात पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या माध्यमातून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा उभा करण्याचे काम लवकरच सुरू केले जाईल. अशी ग्वाही आमदार अमोल खताळ यांनी दिली.
भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास आमदार अमोल खताळ यांच्या शुभहस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी जेष्ठ शेतकरी नेते संतोष रोहम, रिपाइंचे तालुकाध्यक्ष अशिष शेळके, शहराध्यक्ष कैलास कासार, शिवसेनेचे तालुकाप्रमुख रामभाऊ राहणे, रमेश काळे, शहराध्यक्ष विनोद सूर्यवंशी, दिनेश फटांगरे, सौरभ देशमुख, रणजीत जाधव, अंबादास अनमल, दिपाली वाव्हळ, सोमनाथ भालेराव, भारत गवळी, दिलीप रावळ, शशांक नामन, सिद्धार्थ खरात, मंजाबापू साळवे, भाजपचे राजेंद्र सांगळे, संतोष बलसाने, संपत गेठे, वरद बागुल, कांचन ढोरे, संध्या खरे, सपना जाधव यांच्यासह महायुतीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आमदार खताळ म्हणाले की, संगमनेर शहरामध्ये सामाजिक भवन झाले पाहिजे अशी मागणी समाज बांधवांनी आपल्याकडे केली आहे. आपण जागा शोधण्यास त्यांना सांगितली आहे. त्यासाठी राज्याचे सामाजिक न्यायमंत्री संजय राठोड यांच्या माध्यमातून वीस लाख रुपयाचा निधी उपलब्ध झाला आहे. ते ही काम जागा उपलब्ध झाल्यानंतर लवकरच सुरू केले जाईल.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या राज्यघटनेमुळे माझ्यासारखा एका सर्व सामान्य शेतकऱ्याचा मुलगा या तालुक्याचे लोकप्रतिनिधित्व करत आहे. त्यामुळेचं खऱ्या अर्थाने संविधानाची ओळख झाली आहे. येथून पुढील काळात माझा सर्व घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न राहील. परंतु त्यांचे विचार सर्वत्र पोहोचविण्याचे काम येथून पुढील काळात सर्वांनी करावे करावे असा सल्ला आमदार खताळ यांनी दिला.
दरम्यान भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला राज्याचे जलसंपदा मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.