आश्वी येथे उद्या भगवान महावीर यांच्या जयंती सोहळ्याचे आयोजन
◻️ जैन ध्वजवंदना, अहिंसा रॅली, लिफ्ट उद्घाटन व प्रवचन कार्यक्रमाचे आयोजन
◻️ सायंकाळी भाविकांना महाप्रसादाचे वाटप होणार
संगमनेर LIVE (आश्वी) | राष्ट्रसंत गुरुदेव आचार्य सम्राट प. पू. आनंदऋषीजी म. सा. यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या संगमनेर तालुक्यातील आश्वी येथे तीर्थकर भगवान महावीर यांच्या जयंती सोहळ्याचे उद्या गुरुवार दि. १० एप्रिल २०२५ रोजी सकाळी आयोजन करण्यात आले आहे.
याप्रसंगी दक्षिणज्योती प. पू. डॉ. आदर्शज्योतिजी म. सा., मधुरवक्ता प. पू. डॉ. आत्मज्योतिजी म. सा., संगितप्रेमी प. पू. डॉ. रजतज्योतिजी म. सा. हे या जयंती उत्सव सोहळ्यासाठी उपस्थित राहणार आहेत. गुरुवारी सकाळी ८ वा. जैन ध्वजवंदना, ७.३० वा. अहिंसा रॅली जैन स्थानकापासून निघणार आहे. ९.३० वा. अॅड. अशोकलालजी बोरा यांच्या देणगीतून साकारलेल्या जैन धर्म स्थानकातील लिफ्टचे उद्घाटन संपन्न होणार आहे. १० वा. सुमधुर व अमृततुल्य प्रवचनाचा लाभ उपस्थित भाविकांना घेता येणार आहे. यानंतर स्व. शांताबाई मुळचंदजी बोरा परिवाकडून गौतमप्रसादीचे वाटप होणार आहे.
दरम्यान भगवान महावीर यांच्या जयंती सोहळ्यानिमित्त गुरुवारी सायंकाळी ६ वा. सुभाषलाल गांधी, सुमतीलाल गांधी, संतोष भंडारी, निलेश चोपडा, अमित भंडारी, नितिन गांधी, अमित गांधी, अश्विन मुथ्था यांच्या वतीने भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. या महाप्रसादाचा भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले असून हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जैन श्रावक संघ आणि नवकार ग्रुप युवक मंडळ परिश्रम घेत आहे.