प्रभू येशू ख्रिस्त यांनी जगाला दया, क्षमा, शांतीसह मानवतेची शिकवण दिली
◻️ संगमनेर खुर्द मेथोडिस्ट चर्चमध्ये ख्रिस्ती भाविकांचा गुड फ्रायडे कार्यक्रम संपन्न
संगमनेर LIVE | प्रभू येशू ख्रिस्त यांच्या मुखातून वध स्तंबावर छळल्यानंतर मानवतेच्या हितासाठी व कल्याणासाठी जे सात उद्गार निघाले त्यातून देवाच्या इच्छेचा आणि येशू ख्रिस्तांच्या व्यक्तिमत्त्वाचा शोध घेतला जाऊ शकतो. येशू ख्रिस्त यांनी संपूर्ण जगालाच दया, क्षमा शांती यांसह मानवतेची शिकवण दिली. असे प्रतिपादन मेथोडिस्ट चर्चचे सचिव प्रा. बाबा खरात यांनी केले.
गुड फ्रायडेनिमित्त संगमनेर येथील मेथोडिस्ट चर्च येथे ख्रिस्ती बांधवांच्या वतीने करण्यात आलेल्या कार्यक्रमत ते बोलत होते. चर्चेचे धर्मगुरू रेव्ह सतीश मिरजकर, भाऊसाहेब नेटके, अरविंद राठोड, विजय खंडिझोड, राजेंद्र सांगळे, प्रभाकर चांदेकर, राजेंद्र गायकवाड, प्रवीण रोहम, विलास जाधव, सौ. सुनीता खंडीझोड, मनीषा कसाब, डॉ. सौ. हेमलता राठोड, सौ. हन्ना जाधव, सौ. प्रतिभा रोहम, सौ. रश्मी सांगळे, सौ. संजीवनी गायकवाड, सौ. चांदेकर आदी यावेळी उपस्थित होते.
बाबा खरात म्हणाले की, वध स्तंभावर येशू ख्रिस्तांच्या मुखातून निघालेले सप्तोद्गार हे ख्रिस्तांच्या अंतरंगाचा ठाव घेणारे व स्वतःच्या कार्याचे मूल्यमापन करणारे असे आहे. त्यात ते म्हणतात की, हे प्रभू यांना क्षमा कर कारण हे काय करतात यांना माहीत नाही, हे प्रभू मी आपला आत्मा तुझ्या हाती सोपून देतो खरे तर येशू ख्रिस्त यांचे जीवन संपूर्ण जगाला मानवतेची शिकवण देणारे आहे. गुड फ्रायडे निमित्त येशू ख्रिस्त यांच्या विचारांचा आपण जागर करत असल्याचेही ते म्हणाले.
यावेळी रेव्ह सतीश मिरजकर म्हणाले की, ख्रिस्ती समाजात गुड फ्रायडे निमित्त प्रभू येशू ख्रिस्त यांच्या सात उदगारांवर चिंतन केले जाते. प्रभू येशू ख्रिस्त हे बलिदान, प्रेम, करुणा ,शांती, दया क्षमा याचे प्रतीक असल्याचेही ते यावेळी म्हणाले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन सत्यानंद कसाब यांनी केले. तर, आभार प्रा. बाबा खरात यांनी मानले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी खजिनदार प्रतीक खरात, जितेंद्र सांगळे, अभिजीत चांदेकर यांनी विशेष परिश्रम घेतले.
दरम्यान गुड फ्रायडे आणि ईस्टर संडे निमित्त माजी मंत्री लोकनेते बाळासाहेब थोरात, माजी आमदार सुधीर तांबे, आमदार सत्यजित तांबे, डॉ. जयश्रीताई थोरात, कारखान्याची संचालक इंद्रजीत थोरात, सौ. दुर्गाताई तांबे यांनीही संवेदना व्यक्त केल्या.