मांचीहिल शैक्षणिक संकुलात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा
◻️ ज्येष्ठ आयुर्वेद तज्ज्ञ डॉ. शशिकांत काळे यांच्या हस्ते ध्वजारोह संपन्न
संगमनेर LIVE | संगमनेर तालुक्यातील मांचीहिल शैक्षणिक संस्थांनमध्ये १ मे हा महाराष्ट्र दिन व कामगार दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी ज्येष्ठ आयुर्वेद तज्ज्ञ डॉ. शशिकांत काळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
याप्रसंगी मांचीहिल संस्थेतील अकाउंट विभागातील कर्मचारी अमित गणपत वाणी यांना आदर्श कामगार पुरस्कार देण्यात आला. तसेच मृणालिनी काळे यांचा देखील सत्कार करण्यात आला असून त्यांनी देशभक्तीपर गीत सादर केले.
ध्वजारोहणासाठी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले डॉ. शशिकांत काळे यांनी महाराष्ट्र दिन व कामगार दिनाची पार्श्वभूमी सांगितली. यावेळी पाहुण्यांच्या हस्ते अश्विन ग्रामीण आयुर्वेद महाविद्यालयाच्या वतीने उभारण्यात आलेल्या ग्रंथालय व वाचनालयाचे उद्घाटन डॉ. शशिकांत काळे व डॉ. मोहन मोरे यांच्या हस्ते करण्यात आले.
दरम्यान यावेळी संस्थेचे संस्थापक अॅड. शाळीग्राम होडगर, संचालिका नीलिमा गुणे, संस्थेचे अध्यक्ष विजय पिसे, उपाध्यक्ष आण्णासाहेब बलमे, अश्विन आयुर्वेद महाविद्यालयाच्या प्राचार्या डाॅ. शामल निर्मळ, उपप्राचार्य डॉ. शिवपाल खंडीझोड, सीईओ डाॅ. संजीव लोखंडे, जनसंपर्क अधिकारी प्रा. दत्ता शिंदे, अकाउंट विभाग प्रमुख राजू बोंद्रे त्याचबरोबर शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.