मी तुमच्या पाठीमागे भक्कम पणे उभा आहे - आमदार अमोल खताळ
◻️ संगमनेर तालुक्यातील घुलेवाडी येथे शिवसेना शाखेचा शुभारंभ
संगमनेर LIVE | तुमच्या गावांमध्ये काही विनाकारण कार्यकर्त्याना त्रास देत होते त्यांचा तुम्ही बंदोबस्त करण्याचे काम केले आहे. यावरही तुम्हाला काही जण भीती दाखवण्याचा प्रयत्न करत असतील तर, त्यांना अजिबात घाबरू नका. तुमचा भाऊ या नात्याने मी तुमच्या पाठीमागे भक्कमपणे उभे राहील. अशी ग्वाही आमदार अमोल खताळ यांनी दिली.
संगमनेर तालुक्यातील घुलेवाडी येथील शिवसेना शाखेचा शुभारंभ आमदार अमोल खताळ यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी आयोजित कार्यक्रमात बोलताना ते बोलत होते. यावेळी घुलेवाडी शिवसेना शाखेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, पदाधिकारी यांच्यासह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आमदार खताळ पुढे म्हणाले की, विधानसभा निवडणुकीत जसे तुम्ही सर्व युवाशक्ती, मायबाप जनतेने, तालुक्यात परिवर्तन केले असेच परिवर्तन आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका, ग्रामपंचायत निवडणुकित आपणा सर्वाना करायतचे आहे. त्यासाठी तुम्ही सर्वानी कामाला लागावे असे आवाहन केले. तसेच तुम्हाला गावात कोणी दादागिरी करत असेल तर, त्याचा बंदोबस्त करू अशा स्वयंघोषित दादांना अजिबात घाबरू नका. तुम्हाला त्यांनी किती ही भीती दाखवली तरी त्यांचा उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली बंदोबस्त केल्याशिवाय राहणार नाही, अशी ग्वाही त्यांनी शिवसैनिकांना दिली.