लोकनेते डॉ. बाळासाहेब विखे पाटील जयंतीनिमित्त सहायक साधने वाटप
◻️डॉ. विखे पाटील फौंडेशन अहिल्यानगर येथे प्रधानमंत्री दिव्याशा केंद्र सुरु
संगमनेर LIVE (नगर) | लोकनेते डॉ. बाळासाहेब विखे पाटील यांच्या ९३ व्या जयंतीनिमित्त डॉ. विठ्ठलराव विखे पाटील फौंडेशन संचलित प्रधानमंत्री दिव्याशा केंद्र, अहिल्यानगर अंतर्गत ४१ दिव्यांग व वयोवृद्ध व्यक्तींना सहायक साधनांचे वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे डॉ. पी. एम. गायकवाड, डॉ. अभिजित दिवटे, डॉ. पडळकर, डॉ. दीपक अनाप आदि अधिकारी उपस्थित होते. डॉ सुजय विखे पाटील यांच्या प्रयत्नातून डॉ. विखे पाटील फौंडेशन अहिल्यानगर येथे सुरु झालेल्या प्रधानमंत्री दिव्याशा केंद्र अंतर्गत दररोज पात्र वयोवृद्ध (६० वर्षावरील) व दिव्यांग व्यक्तींना सहायक साधनाचे वाटप करण्यात येणार आहे.
भारतीय कृत्रिम अंग निर्माण निगम व सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालय, भारत सरकार यांच्या अंतर्गत सुरु झालेले हे भारतातील ७१ वे व महाराष्ट्रातील ४ थे केंद्र आहे. या केंद्रातील सुविधांचा फायदा घ्यावा असे आव्हान डॉ. सुजय विखे पाटील यांनी केले आहे.