अवकाळी पावसाने कुक्कुटपालन शेड जमीनदोस्त

संगमनेर Live
0
अवकाळी पावसाने कुक्कुटपालन शेड जमीनदोस्त

◻️ ८ हजार पक्षी मृत्यूमुखी ; शेतकऱ्याचे १० लाखाचे नुकसान



संगमनेर LIVE (अकोले) | अवकाळी आणि बिगर मोसमी पावसामुळे ढगफुटी सदृश्य परिस्थितीमुळे झालेल्या मुसळधार पावसामुळे अकोले तालुक्यातील पिंपळदरी येथे कुक्कुटपालन शेड जमीनदोस्त झाल्यामुळे ८ हजार पक्षी मृत झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्याचे लाखो रुपयाचे नुकसान झाले आहे.

पिंपळदरी येथील एकनाथ सोपान रंधे यांची चारशे फुट कुक्कुट पालन शेड होते. अठरा हजार पक्षी असणारी शेड असून सध्या दहा हजार पक्षी शेड मध्ये होते. मंगळवारी दुपारी दोनच्या दरम्यान अचानक वादळ वारा सुटला अन जोराचा पाऊस सुरु झाला यामध्ये शेडच्या भोवतली असणारे चेरीचे झाडें शेडवर उन्माळून पडले. 

तसेच जोरदार सोसाट्याचा वारा अन झाडाचा बोजामुळे चारशे फुट शेड जमीनदोस्त झाली. यामध्ये दहा हजार कोंबडीचे पिल्ले होती. हे पक्षी त्याखाली दबली गेली व मृत्यूमुखी पडली आहे. यामुळे जवळपास दहा लाख रुपयापेक्षा अधिकचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.

दरम्यान या शेतकऱ्यावर अस्मानी संकट कोसळले असून त्याला आर्थिक मदत मिळावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !