सहा वर्षाच्या अर्णाने गायलेल्या महाराष्ट्र गीताने रसिक मंत्रमुग्ध!
◻️ मुंदडा परिवारातील लाडक्या लेकीचे सर्वच स्तरातून कौतुक
संगमनेर LIVE (अहील्यानगर) | सचिन अरुणकुमार मुंदडा यांची लाडकी लेक अर्णा ही तिने गायलेल्या ‘महाराष्ट्र गीता’मुळे चर्चेत आलेली आहे. अतिशय चुणचूणीत असलेली कुमारी अर्णा छत्रपती संभाजीनगर शहरातील अग्रसेन विद्या मंदिर या शाळेत पहिलीच्या वर्गात शिकत आहे.
१ मे महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून ‘तिने गर्जा जयजयकार महाराष्ट्र माझा’ हे महाराष्ट्र गीत पा करून ते तालबद्ध पद्धतीने गाऊन दाखवले. उत्कृष्टपणे गाऊन दाखवलेले हे गीत ऐकून उपस्थित सर्वच मंडळी मंत्रमुग्ध झाली. अगदीच वय वर्ष सहा असलेल्या या छकुलीने अगदी हावभावासहीत अप्रतिमपणे हे गीत बोबड्या बोलीत सादर केले.
तिचे हे गीत समाजमाध्यमांमध्ये व्हायरल झाल्यामुळे सर्व स्थरातून छोट्या आणि नटखट अशा अर्णावर कौतुकांचा वर्षाव होत आहे. अर्णाचे वडील पत्रकार असून तिची आत्या शिक्षिका आहे. सार्वजनिक जीवनात वावरणारे मुख्य संपादक आणि ज्येष्ठ पत्रकार अरुणकुमार मुंदडा यांची अर्णा ही लाडकी नात आहे.
दरम्यान मुंदडा कुटुंबातील सुसंस्कृत आणि प्रगल्भ वातावरणामुळे अर्णाचे व्यक्तिमत्वही या वातावरणाला अनुकूल असेच घडते आहे. मागील वर्षी अर्णाचा मोठा भाऊ अर्णव याचे एक पुस्तक दिल्ली येथील एका सुप्रसिद्ध प्रकाशनाने प्रकाशित केलेले आहे.