वाहकाची असंवेदनशीलता ; सुट्टे पैसे नसल्याने मुलाला बसमधून खाली उतरवले

संगमनेर Live
0
वाहकाची असंवेदनशीलता ; सुट्टे पैसे नसल्याने मुलाला बसमधून खाली उतरवले


◻️ सरुनाथ उंबरकर यांची थेट आमदार अमोल खताळ यांच्याकडे तक्रार

◻️ माणूसकी मेली का? या घटनेनतंर नागरीकानमध्ये संताप



संगमनेर LIVE (आश्‍वी) | संगमनेर तालुक्यातील उंबरी बाळापूर येथील पार्थ बाबासाहेब भुसाळ हा अल्पवयीन मुलगा उपचारासाठी लोणी येथे जात होता. मात्र तिकीट काढण्याकरीता त्यांच्याकडे सुट्टे पैसे नव्हते. त्यामुळे ऑनलाईन पैसे मागवण्यासाठी आईला त्यानें फोन केला. तरी ही बस वाहक यांनी असंवेदनशीलपणा दाखवत मध्येचं म्हणजे दाढ बुद्रुक येथे त्याला उतरून दिले. ही धक्कादायक घटना उघडकीस आल्यानंतर नागरीकांनी संताप व्यक्त केला आहे. तर, संगमनेर पंचायत समितीचे माजी विरोधी पक्षनेते सरुनाथ उंबरकर यांनी थेट आमदार अमोल खताळ यांच्याशी संपर्क साधून त्यांना हा घटनाक्रम सांगून संबंधितावर कारवाई करण्याची मागणी केली.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, उंबरी बाळापूर येथील पार्थ बाबासाहेब भुसाळ (वय- १६) हा अल्पवयीन मुलगा आजारी असल्याने लोणी येथे उपचार घेण्यासाठी चालला होता. संगमनेर हून लोणीच्या दिशेने जाणाऱ्या एसटी बसमध्ये उंबरी येथून बसला होता. यावेळी एसटीच्या महिला वाहक यांनी त्यांच्याकडे तिकीटासाठी सुट्टे पैसे मागीतले. मात्र, त्यांच्याकडे सुट्टे पैसे अथवा ऑनलाईनची पैसे देण्याची सोय नसल्यामुळे त्याने महिला वाहक यांचा फोन पे नंबर आईला पाठवून ऑनलाईन पैसे पाठवण्यास सांगितले. 

पैसे येण्याची वाट पाहण्याऐवजी असंवेदनशीलपणा दाखवत एसटीच्या वाहक यांनी पार्थला दाढ बुद्रुक (ता. राहाता) याठिकाणी उतरून दिले. याप्रसंगी पार्थ हा हात जोडून विनंती करत असताही त्याला एसटीतून खाली उतरविण्यात आले. दाढ बुद्रुक गावात त्याचे कोणीच ओळखीचे नसल्यामुळे घाबरून तो रडत होता. त्यादरम्यानच्या काळात पार्थच्या आईने फोन पे वर पैसे पाठवले असल्याची माहिती मिळाली आहे.

दरम्यान ही पोस्ट समाज माध्यमातून मोठ्या प्रमाणात वायरल झाल्यामुळे तालुक्यातील नागरीकांनी संताप व्यक्त केला.

महिला एसटी वाहकाने अल्पवयीन आजारी मुलांसमवेत असंवेदनशील वर्तन करुन त्यांच्यातील माणूसकी मेली असल्याचे दाखवून दिले. या घटनेमुळे एसटी खात्याची मोठी बदनामी झाली आहे. त्यामुळे या असंवेदनशील वाहकांची चौकशी करून नोकरीतून बडतर्फ करण्याबरोबरच संगमनेर एसटी डेपो मॅनेजर यांचेवर देखील कारवाई करावी. अशी मागणी संगमनेर पंचायत समितीचे माजी विरोपक्षनेते सरुनाथ उंबरकर यांनी आमदार अमोल खताळ यांच्याकडे संपर्क साधून केली. तर, भीतीपोटी अशा अनेक घटना उघडकीस येत नसल्याचे सांगून भविष्यात अशा घटना घडू नये. यासाठी योग्य त्या उपयोजना कराव्यात अशी मागणी देखील उंबरकर यांनी संगमनेर लाईव्ह शी बोलताना केली.
Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !