जिल्ह्याचा अभिमान! जवान संदीप गायकर यांचे देशासाठी बलिदान
◻️ ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी श्रद्धांजली केली अर्पण
संगमनेर LIVE | देशाच्या सुरक्षेसाठी लढताना आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या अकोले तालुक्यातील ब्राह्मणवाडा येथील सुपुत्र जवान संदीप पांडुरंग गायकर यांना वीरमरण आले आहे. ते १५ मराठा बटालियनमध्ये कार्यरत होते आणि जम्मू-काश्मीरमधील तीसवाड सेक्टरमध्ये दहशतवाद्यांशी लढताना हुतात्मा झाले.
भारताच्या सीमांचे रक्षण करताना असंख्य जवानांनी आपल्या प्राणांची आहुती दिली आहे. त्यात अकोले - संगमनेर भागातील संदीप गायकर यांचं योगदान अत्यंत महत्त्वपूर्ण असून, त्यांच्या शौर्याचा आणि त्यागाचा अभिमान संपूर्ण महाराष्ट्राला राहील.
“सीमेवर कर्तव्य बजावताना दिलेलं संदीपचं बलिदान जिल्ह्यासाठी कायम प्रेरणादायी राहील,” अशी भावना काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केली.