धोकादायक वाहन चालवणाऱ्या ६ चालकांवर पोलीसांची कारवाई

संगमनेर Live
0

धोकादायक वाहन चालवणाऱ्या ६ चालकांवर पोलीसांची कारवाई

◻️ परिवहन महामंडळाच्या बस चालकावरही कारवाईचा बडगा

◻️ वाहन चालकांना शिस्त लावण्यासाठी पोलीस रस्त्यावर



संगमनेर LIVE (राहुरी) | राहुरी पोलीस स्टेशन हद्दीत येथे वारंवार ट्राफिक जाम होत असून सदर जामचे मूळ कारण हे बरेचसे वाहन चालक हे थोडेही ट्राफिक जाम असल्यास फुटलेल्या रोड डिव्हायडर मधून रॉंग साईडने गाड्या टाकतात व त्यामुळे तासंतास वाहतुकीचा खोळंबा होत होता. त्यामुळे शिर्डी - शनि शिंगणापूर महामार्गावर वाहनचालकांना शिस्त लावण्यासाठी पोलीस रस्त्यावर होते.

यावेळी उपाययोजना म्हणून चौकात वाहतूक नियमन करण्याबरोबरच रॉंग साईड वाहने टाकून ट्राफिक जाम करणाऱ्या सहा वाहन चालकांवर एमव्हीअ १२२/१७७ प्रमाणे कारवाई करण्यात आली. यापूर्वीही दिनांक १०/०५/२०२५ रोजी दोन वाहन चालकांवर धोकादायक वाहन चालवल्या बाबत कारवाई करून न्यायालयामार्फत दोन्ही वाहनांवर सुमारे पाच हजार रुपये दंडात्मक कारवाई करण्यात आलेली होती.

बऱ्याच वेळा एसटी महामंडळाच्या बसेसचे चालक सुद्धा रॉंग साईड गाड्या घालतात असे निदर्शनात आल्याने दिनांक ११ मे २०२५ रोजी राज्य परिवहन महामंडळ बस स्थानक प्रमुख राहुरी व राज्य परिवहन महामंडळ आगार प्रमुख श्रीरामपूर यांना लेखी पत्र व्यवहार करून सर्व बस चालकांना कोणत्याही परिस्थितीत रॉंग साईड गाडी टाकून वाहतुकीला अडथळा न करण्याबाबत कळवलेले होते.

तरीसुद्धा आज सुमारे ११.३० चे सुमारास अकलुज डेपोची बस एमएच १४ बीटी ४२२४ वरील चालकाने राहुरी कॉलेज ते राहुरी बस स्थानक दरम्यान ट्राफिक जाम झाल्याने रॉंग साईट धोकादायक पद्धतीने गाडी घातली. ज्यामुळे अधिकच ट्राफिक जाम झाल्याने सदर बस वर एमव्हीअ १८४ प्रमाणे कारवाई करण्यात आली. या कारवाईनंतर न्यायालयाकडून चार हजार रुपयांपर्यत दंड व सहा महिने ते एक वर्षापर्यत कारावास होऊ शकतो.

राहुरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी नागरिकांना आव्हान केले की, कोणीही रॉंग साईड गाडी टाकून वाहतूक जाम करू नये. तसेच वाहतूक जाम टाळण्यासाठी अशा प्रकारची कारवाई नियमित राहुरी फॅक्टरी तथा राहुरी शहरात केले जाणार असल्याची माहिती राहुरी पोलिसांनी दिली.

यावेळी पीएसआय आहेर, पोलीस हवालदार संतोष ठोंबरे, पोलीस हवालदार फुलमाळी, सचिन ताजणे यांचे पथक कारवाई करत होते.

दरम्यान ही कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे, अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कुलबर्गे, उपविभागीय पोलिस अधिकारी बसवराज शिवपुजे यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक संजय ठेंगे आणि राहुरी पोलीस स्टेशन यांनी केली.

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !