दैदिप्यमान यश संपादन केल्याबद्दल सुनबाईचा अभिमान - अॅड. शाळीग्राम होडगर
◻️ डॉ. सौ. रुचीरा दिग्विजयसिंह होडगर ‘डॉक्टरेट ऑफ नॅशनल बोर्ड परिक्षा’ उत्तीर्ण
◻️ होडगर कुटुंबात आता ६ उच्च शिक्षित डॉक्टर ; पंचक्रोशीतून अभिनंदनाचा वर्षाव
संगमनेर LIVE (आश्वी) | संगमनेर तालुक्यातील शिक्षण क्षेत्रात नावलौकिक असलेल्या मांचीहिल शैक्षणिक संकुलाचे संस्थापक अॅड. शाळीग्राम होडगर व सौ. शिलाताई होडगर यांच्या सुनबाई तसेच डॉ. दिग्विजयसिंह होडगर यांच्या पत्नी डॉ. सौ. रुचीरा होडगर - भट्टाचार्य (एमबीबीएस व एमएस) यानी नुकतीच वैद्यकीय क्षेत्रातील नामांकित डॉक्टरेट ऑफ नॅशनल बोर्ड (DrNB) ही पदवी कॅन्सर सर्जरीसाठी उच्च श्रेणीत उत्तीर्ण केली आहे. त्यामुळे होडगर कुटुंबात आता ६ उच्च शिक्षित डॉक्टर झाल्यामुळे आश्वी पंचक्रोशीतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
डॉ. सौ. रुचीरा दिग्विजयसिंह होडगर यानी एमबीबीएस आणि एमएस (शस्त्रक्रिया) ही पदवी मुंबई येथील सुप्रसिध्द जे. जे. रुग्णालयातुन प्राप्त केली असून डॉक्टरेट ऑफ नॅशनल बोर्ड परिक्षा’ त्यांनी पश्चिम बंगाल राज्यातील कोलकाता स्थित टाटा रुग्णालयातून देऊन त्यात दैदिप्यमान यश मिळवले आहे. कॅन्सर सारख्या दुर्धर आजारावर आता त्या उपचार करणार आहेत. पश्चिम बंगाल राज्यातील कोलकाता येथील कर्नल रविंन्द्रकुमार भट्टाचार्य व सौ. चिन्मयी भट्टाचार्य यांच्या त्या कन्या आहेत. तर जिल्ह्यात ही ऊच्च पदवी मिळवणाऱ्या एखाद दुसऱ्याचं असण्याची शक्यता नाकारता येत नाही.
त्याचबरोबर त्यांचे पती डॉ. दिग्विजयसिंह होडगर (एमडी मेडीसीन) यांनी सुध्दा नुकतीचं एनबी (गॅस्ट्रो) ही पदवी संपादीत केली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील गोर गरीब नागरीक व कॅन्सर रुग्णांना यांचा मोठा फायदा होणार असल्यामुळे या यशासाठी सुनबाईचा अभिमान असल्याची प्रतिक्रिया अॅड. शाळीग्राम होडगर यांनी दिली.
दरम्यान डॉ. सौ. रुचीरा होडगर यांच्या यशाबद्दल राज्याचे जलसंपदामंत्री मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ. शालिनीताई विखे पाटील, माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील, अॅड. शाळीग्राम होडगर, डॉ. शैलेंद्रसिंह होडगर, डॉ. दिग्विजयसिंह होडगर, संचालिका नीलिमा गुणे, संस्थेचे अध्यक्ष विजय पिसे, उपाध्यक्ष आण्णासाहेब बलमे यांच्यासह शिक्षण संकुलातील सर्व विभाग प्रमुख, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी अभिनंदन करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
डॉ. सौ. रुचीरा होडगर यांचे माहेर पश्चिम बंगाल राज्यातील कोलकाता आहे. त्यांचे पंजोबा राजेंद्रकुमार भट्टाचार्य हे कोलकाता उच्च न्यायालयात वरिष्ठ अधिवक्ता होते. तर, कोलकता हिंदू महासभेचे संस्थापक अध्यक्ष होते. त्याचबरोबर त्याचे आजोबा जितेंद्रकुमार भट्टाचार्य हे कोलकाता हायकोर्टाचे न्यायधीश होते. तसेच त्याच्या आईचे वडील शैलेंद्रनाथ हलदार हे कोलकाता येथील सुप्रसिद्ध कालीघाट मंदिराचे मुख्य सेवायत होते. मामा स्वरूपकुमार हे केंद्र शासनाच्या मानव संसाधन विभागात वरिष्ठ व्यवस्थापक होते. तर, त्यांच्या बहिणीचे पती हे भारतीय लष्करात कर्नल म्हणून कार्यरत आहेत. अशा उच्च शिक्षित व संस्कारक्षम कुटुंबांचा वारसा त्यांना असल्यामुळे त्यांच्या हातुन देश सेवा घडो. अशा शुभेच्छांचा त्यांच्यावर वर्षाव होत आहे.