ग्रामीण भागातील तरुणांना खेळासाठी प्रोत्साहन देणार - आमदार अमोल खताळ
◻️ जांभूळवाडीफाटा येथे ‘आमदार चषक’ शुभारंभप्रसंगी आमदार खताळ यांची जोरदार फटकेबाजी
संगमनेर LIVE | ग्रामीण भागातील तरुणांना खेळण्या साठी प्रोत्साहन देत व्यासपीठ उपलब्ध करून दिले जाईल. असा विश्वास आमदार अमोल खताळ यांनी आमदार चषक क्रिकेट स्पर्धेच्या शुभारंभ प्रसंगी व्यक्त केला.
संगमनेर तालुक्यातील जांभुळवाडी फाटा येथे आमदार चषक क्रिकेट स्पर्धेचा शुभारंभ आमदार अमोल खताळ यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी आमदार अमोल खताळ यांनी हातात बॅट घेऊन चौकार षटकार मारत फटकेबाजी केली.
यावेळी आमदार खताळ म्हणाले की, पूर्वी दुष्काळी भाग म्हणून या भागाला हिणवले जात होते. मात्र, आता या भागात पाणी आले आहे. त्याचबरोबर क्रिकेट सारख्या मोठ्या स्पर्धा सुद्धा होत आहे. या स्पर्धांमधून ग्रामीण भागातील तरुणांना खेळण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देत त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी आपला प्रयत्न राहणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली.
यावेळी कवठे कमळेश्वरचे माजी सरपंच नवनाथ जोंधळे, तळेगावचे माजी सरपंच मयूर दिघे, कासारे सरपंच महेश बोऱ्हाडे, नवनाथ कानकाटे, सचिन जोंधळे, योगेश जोंधळे गणेश वराडे, अमित सुपेकर, अशोक गाढे, गोरख नाईक, सोमनाथ शेळके, शामराव नाईक, वाल्मीक गाडे, मयूर कार्ले, सुयोग कार्ले, दत्तात्रय कार्ले, रमेश कानकाटे, गोरख गांडुळे, संजय लाहामगे, दत्तात्रय गाडे, भागवत गायकवाड, एकनाथ गाडे, दत्तात्रय सोनवणे, नंदकुमार मोरे, मेजर अक्षय कार्ले, अक्षय आरणे, पत्रकार रामनाथ बोऱ्हाडे, भीमा कार्ले, संजय जोंधळे यांच्या सह परिसरातील तरुण मोठ्या संख्येने उपस्थित होते.