शिक्षकांनी समर्पण भावनेने काम केल्यामुळेचं रयतचा वटवृक्ष बहरला - अरुण कडू
◻️ अॅड. अशोक बोरा यांच्याकडून आश्वी येथील रयतेच्या शाळेला १ कोटी रुपयांची देणगी
◻️ रयतचे जेष्ठ शिक्षक आणि प्रभारी प्राचार्य राजेंद्र शहाणे सेवानिवृत्त
संगमनेर LIVE | शिक्षकांनी समर्पण भावनेने काम केल्यामुळेचं रयत शिक्षण संस्थेचा वटवृक्ष बहरला असून प्रभारी प्राचार्य पदावर कार्यरत असतांना राजेंद्र शहाणे यांनी संस्थेला सुमारे १ कोटी रुपयांचा निधी मिळवुन देण्याचे केलेले कार्य कौतुकास्पद आहे. असे गौरवोद्गार रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष अरुण कडू पाटील यांनी काढले.
संगमनेर तालुक्यातील आश्वी बुद्रुक येथील रयत शिक्षण संस्थेचे शाळेचे शिक्षक राजेंद्र नानासाहेब शहाणे ३० वर्षाच्या प्रदीर्घ सेवेतून सेवानिवृत झाले. त्यामुळे आयोजित केलेल्या कार्यक्रमात अरुण कडू बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी संरपच आणि स्थानिक स्कुल कमेटी सदस्य बाळकृष्ण पाटील होडगर होते.
यावेळी सुमतीलाल गांधी, किरण कडू पाटील, सुशील भंडारी, सुभाषराव म्हसे, भाऊसाहेब शिरसाठ, कैलास पाटणी, माजी प्राचार्य सोमनाथ दिघे, चंद्रभान गोर्डे, जनार्दन बर्डे, कैलास पाटणी, वेणुनाथ गायकवाड, राजेद्र गोडगे, युनुस पठाण, डाॅ. शिंदे, भाऊराव कांगुणे, केदार बिहाणी, पत्रकार योगेश रातडीया, हर्षल खेमनर, संतोष ताजणे, भाऊसाहेब मदने, अनिल शिखरे, संजय मैड, सुरेश थोरात, बिजला भुसाळ, ओमकार भगत, दयाळ कूलथे, रमेश डहाळे, बापूसाहेब दिघे, प्रशांत गोडगे, महेश कुलथे, प्रकाश मैड, बाळासाहेब गायकवाड, रामनाथ जऱ्हाड, अण्णा शिंदे, अशोक वाडेकर, बबन भुसाळ, अभिजीत ताजणे, अझर शेख, ताऊसिफ शेख, भाऊसाहेब मदने, भाऊसाहेब खेमनर, वैभव पवार, किशोर जऱ्हाड, विठ्ठल भुसाळ यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ, शिक्षक आणि व्यापारी उपस्थित होते.
सत्काराला उत्तर देतांना भावूक झालेले जेष्ठ शिक्षक राजेद्र शहाणे म्हणाले, सेवानिवृत्ती जवळ आलेली असतांनाही समाजात विविध पदांवर कार्यरत असलेल्या माजी विद्यार्थ्यानशी संपर्क साधत संस्थेशी त्यांची नाळ जोडली. माजी विद्यार्थ्यानचे मेळावे आयोजित करण्यासाठी त्यांना मार्गदर्शन केले. त्यामुळे मोठ्याप्रमाणात माजी विद्यार्थ्यानचे मेळावे संपन्न झाले.
आश्वी बुद्रुक गावचे सुपुत्र आणि पुणे येथील प्रतिष्ठित विधीतज्ज्ञ अॅड. अशोक बोरा यांनी रयतेच्या आश्वी इंग्लिश स्कूल व महाविद्यालयाला इमारतीसाठी सुमारे १ कोटी रुपयांची देणगी दिली. याचबरोबर इतर ही माजी विद्यार्थ्यानी आर्थिक, वस्तु स्वरुपात मदत केली. सेवानिवृत झालो तरी, रयत शिक्षण संस्था हे माझे कुटुंब आहे. त्यामुळे या कुटुंबातील विद्यार्थी, शिक्षक आणि संस्थेसाठी सदैव समर्पण भावनेतून कार्यरत राहील असे सांगतात शहाणे यांना आश्रु लपवता आले नाहीत.
दरम्यान या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य देवराम वडीतके यांनी केले. तर, सुत्रसंचालन श्रीमती गाडे आणि आभार श्रीमती सहाणे यानी मानले.