संगमनेर तालुक्यातील शेतकऱ्यांचे कालव्यातील पाईप प्रशासनाने फोडले?

संगमनेर Live
0
संगमनेर तालुक्यातील शेतकऱ्यांचे कालव्यातील पाईप प्रशासनाने फोडले?


◻️ संतप्त ५०० शेतकऱ्यांकडून सुरू असलेल्या ठिय्या आंदोलनाला यश

संगमनेर LIVE | माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी दुष्काळी भागातील जनतेकरता निळवंडे धरण, डावा आणि उजवा कालवा पूर्ण केला. या कालव्यातून तीन रोटेशन झाले. मात्र प्रत्येक वेळी संगमनेर तालुक्याला डावलण्यात आले. तसेच कालव्यावरील पाईप हे प्रशासनाने कोणतीही पूर्व सूचना न देता फोडल्याचा गंभीर आरोप करत संतप्त झालेल्या ५०० शेतकऱ्यांनी रात्रभर आंदोलन केले.

सध्या उन्हाळी आवर्तनातून उजव्या आणि डाव्या कालव्यातून पाणी सुरू आहे. हे पाणी संगमनेर तालुक्यातून पुढे जात असताना तालुक्याला मात्र, पाण्यापासून वंचित ठेवले जात असल्याचा आरोप करण्यात आला असून नवीन लोकप्रतिनिधी यांनी सर्व बांधारे भरून घेऊ, अशी पेपरबाजी केल्यावर सवाल उपस्थित केला.

डाव्या व उजव्या कालव्यातून मागील दोन वर्षात तीन आवर्तने झाली मात्र, संगमनेर तालुक्याला प्रत्येक वेळी टाळण्यात आले. याबाबत शेतकऱ्यांनी बाळासाहेब थोरात यांच्याकडे पाठपुरावा केला. थोरात यांनीही प्रशासनाला संगमनेर तालुक्यातील शेतकऱ्यांची मागणी रास्त असून त्यांना पहिले पाणी मिळाले पाहिजे यासाठी आपण काम करावे अशा सूचना दिल्या. मात्र प्रशासन हे सत्ताधाऱ्यांच्या दबावात आहे. त्यांनी संगमनेरला पाणी दिले नाही. हक्काचे पाणी मिळत नसल्याने शेतकरी हवालदिल झाला होता. अशावेळी लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या माध्यमातून उजव्या व डाव्या कालव्यावरील विविध गावांमधील शेतकऱ्यांसाठी सुमारे दोन कोटी रुपयांचे पाईप उपलब्ध करून देण्यात आले.

हे पाईप शेतकऱ्यांनी उजव्या व डाव्या कालव्यावर टाकून आपल्या शेतीसाठी पाणी घेतले. उजव्या कालव्यावर निमगाव खुर्द ते खळी यामधील विविध गावांमधील शेतकऱ्यांनी पाईपद्वारे पाणी उचलले तर डाव्या कालव्यातून पिंपळगाव कोंझिरा ते लोहारे येथील कदम वस्ती या संगमनेर तालुक्यातील शेतकऱ्यांनी पाईप द्वारे पाणी उचलले.

उन्हाळ्यामध्ये शेतकऱ्यांना पिण्याच्या पाण्यासाठी व जनावरांसाठी पाण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे पाणी उचलले आहे. असे असताना प्रशासनाने मात्र शेतकऱ्यांचे काही न ऐकता रात्री अपरात्री येऊन सर्व पाईप फोडून टाकले. असा आरोप शेतकऱ्यांनी केला.

त्यामुळे ५०० शेतकऱ्यांनी शिरापूर येथे इंद्रजीत थोरात यांच्या नेतृत्वाखाली एकत्रित प्रशासनाविरुद्ध आक्रमक भूमिका घेतली. यावेळी पोलीस संरक्षण ही मागवण्यात आले परंतु, शेतकऱ्यांची रास्त मागणी ऐकल्यानंतर अधिकाऱ्यांना चुकीच्या गोष्टीची जाणीव करून दिली. इंद्रजीत थोरात यांच्या पुढाकारातून या शेतकऱ्याच्या आंदोलनाला यश आले असून यापुढे पाईप फोडणार नाही असे या अधिकाऱ्यांनी लेखी दिले असल्याची माहिती दिली.

यावेळी बोलताना तालुका काँग्रेसचे विजय राहणे म्हणाले की, संगमनेर तालुक्याच्या बाहेरील १६ किलोमीटर लांबी करता २० दिवस पाणी आणि अकोले व संगमनेर तालुक्यातील ७५ किलोमीटर लांबी कालव्या करतात फक्त १७ दिवस पाणी हा कुठला न्याय? असा संतप्त सवाल त्यांनी विचारला.

तर स्थानिक आमदार तलाव आणि बंधारे भरून देण्याच्या घोषणा करतात मात्र, प्रत्यक्षात पाणी मिळत नसल्याचे शेतकऱ्यांनी म्हटले. पाईप फोडले जातात त्यावर ते काही बोलत नाही. प्रशासनावर कोणाचा धाक आहे? असा सवाल उपस्थित करण्यात आला.

यावेळी शेकडो शेतकरी व महिला रस्त्यावर उतरल्याने रात्रभर उजव्या व डाव्या कालव्यावर प्रशासनाविरुद्ध जोरदार घोषणाबाजी केली. दरम्यान इंद्रजीत थोरात यांच्या मध्यस्थीनंतर शेतकरी शांत झाले..

इंद्रजीत थोरात यांची शेतकऱ्यांना मदत..

तालुक्याला हक्काचे पाणी मिळावे याकरता लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी निळवंडे धरण व कालवे पूर्ण केले. मात्र सत्ता दुसऱ्यांची आल्याने तालुक्याला उपेक्षित ठेवले जात. तरीही तालुक्याला पाणी मिळाले पाहिजे. ही सातत्याने मागणी सर्वजण करत असून इंद्रजीत थोरात हे रात्री अपरात्री डाव्या व उजव्या कालव्यावर चक्कर मारून शेतकऱ्यांना निळवंडे डाव्या व उजव्या कालव्यातून पाणी मिळेल यासाठी काम करत असून लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या माध्यमातून मिळालेल्या पाईपांमुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. असे उपस्थित शेतकऱ्यांनी म्हटले.
Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !