संगमनेर येथे युवाशक्ती भगव्याखाली एकवटत असल्याचा अभिमान!

संगमनेर Live
0
संगमनेर येथे युवाशक्ती भगव्याखाली एकवटत असल्याचा अभिमान!

◻️ आमदार अमोल खताळ यांच्या उपस्थितीत तरुणांचा मोठ्या संख्येने शिवसेनेत प्रवेश

संगमनेर LIVE | संगमनेर शहर आणि तालुक्यामध्ये अनेक युवक कार्यकर्ते शिवसेनेत प्रवेश करत आहे. तालुक्यात युवाशक्ती भगव्या खाली एकवटत असल्याचा मला सार्थ अभिमान आहे. असे प्रतिपादन आमदार अमोल खताळ यांनी केले.

संगमनेर येथे नुकतीच शिवसेनेची युवक निर्धार बैठक पार पडली. या बैठकीमध्ये शशिकांत (लाला) दायमा, अजित भारते, अनिरुद्ध वाल झाडे, ओंकार शिंदे, ओंकार जंगम, विजय वालझाडे, अजय वालझाडे, आदित्य जोर्वेकर, सौरभ वाकचौरे, रोहित भारती, मोहिज अत्तार, अक्षय संस्कर, शुभम क्षत्रिय यांच्यासह ५० ते ६० युवक कार्यकर्त्यानी शिवसेना पक्षामध्ये जाहीर प्रवेश करत भगवा हातात घेतला. यावेळी आयोजित कार्यक्रमात आमदार खताळ बोलत होते.

खताळ पुढे म्हणाले की, काही दिवसांपूर्वी संगमनेर खुर्द येथील असंख्य कार्यकर्त्यानी शिवसेनेत प्रवेश केला. त्या पाठोपाठ विविध गावातील शहराच्या विविध उपनगरातील युवक कार्यकर्त्यानी सुद्धा शिवसेनेत प्रवेश केला आहे. येथून पुढील काळातही अनेक युवक कार्यकर्ते शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. लवकरच शिवसेनेचे नेते व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत संगमनेर कार्यक्रम होणार असल्याची माहिती आमदार खताळ यांनी दिली.
Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !