आश्‍वी येथील प्रवरेच्या महाविद्यालयातचं विद्यार्थ्याना सर्व दाखले मिळणार!

संगमनेर Live
0
आश्‍वी येथील प्रवरेच्या महाविद्यालयातचं विद्यार्थ्याना सर्व दाखले मिळणार! 

◻️ मंत्री विखे पाटील यांच्या संकल्पनेतून आश्‍वीसह परिसरातील विद्यार्थ्यासाठी सुविधा उपलब्ध 

संगमनेर LIVE (आश्‍वी) | संगमनेर तालुक्यातील आश्‍वी खुर्द येथील लोकनेते डॉ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे कला वाणिज्य विज्ञान व संगणकशास्त्र महाविद्यालयात संस्थेचे अध्यक्ष आणि मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या संकल्पनेतून व मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्याना सर्व प्रकारचे दाखले कमी वेळेत व शासकीय दराने उपलब्ध करुन दिले जात आहेत. अशी माहिती प्राचार्य देविदास दाभाडे यांनी दिली.

दहावी आणि बारावी निकालानंतर विद्यार्थ्याना पुढील शिक्षणासाठी विविध दाखल्यांची आवश्यकता असते. हे दाखले विद्यार्थ्याना महाविद्यालयातच मिळावेत, याकरिता जुलै २०२४ रोजी प्रायोगिक तत्त्वावर पालकमंत्री विखे पाटील यांनी राज्यात सर्वप्रथम प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या सर्व महाविद्यालयांमध्ये सेतू सुविधा केंद्र सुरू केले होते. त्यामुळे विद्यालय तसेच महाविद्यालयातील विद्यार्थ्याना कमी वेळेत आणि शासकीय दराने दाखले उपलब्ध करून दिले जात आहे.

दरम्यान आश्‍वीसह परिसरातील विद्यार्थ्यानी विविध प्रकारचे दाखले काढण्यासाठी कला, वाणिज्य, विज्ञान व संगणकशास्त्र महाविद्यालयातील सेतू कार्यालयाला संपर्क साधावा. असे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. देविदास दाभाडे आणि सेतू समन्वयक प्रा. गणेश शेळके यांनी केले आहे.
Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !