महाराष्ट्राचा सह्याद्री हिमालयाच्या भेटीला ; बाळासाहेब थोरातांनी घेतली सोनम वांगचुकची भेट
◻️ थ्री इडियट चित्रपटातील खरे नायक आणि शिक्षणतज्ज्ञ सोनम वांगचुक यांच्याशी बाळासाहेब थोरात यांची चर्चा
◻️कौशल्य आधारित शिक्षणाचे धडे देण्यासाठी फुनसुक वांगडू संगमनेरला येणार
संगमनेर LIVE | हिंदी चित्रपटाचे दिग्गज अभिनेते आमिर खान यांच्या गाजलेल्या ‘थ्री इडियट’ या चित्रपटाची कथा ज्यांच्या जीवनावर आधारित आहे. असे खरे शिक्षण तज्ज्ञ असलेले फुनसुक वांगडू म्हणजे काश्मीर खोऱ्यातील दुर्गम भागामध्ये विद्यार्थ्याना कौशल्य आधारित शिक्षण देणारे पर्यावरणप्रेमी सोनम वांगचुक यांची नुकतीच महाराष्ट्राचे ज्येष्ठ कॉग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी भेट घेतली. तर, कौशल्य आधारित शिक्षणाबाबत सविस्तर चर्चा करून त्यांना संगमनेरला येण्याचे निमंत्रण दिले. याप्रसंगी अमृतवाहिनी शिक्षण संस्थेच्या विश्वस्त शरयु देशमुख देखील उपस्थित होत्या.
शिक्षणातील करियर हे आपल्या आवडीनुसार करावे किंवा तरुणांना आपल्या आवडीच्या क्षेत्रामध्ये करिअर करण्यासाठी मोकळी संधी द्यावी. यासाठी असलेला ‘थ्री इडियट’ चित्रपट हा अत्यंत लोकप्रिय ठरला होता. यामध्ये आमिर खान यांनी पारंपारिक घोगमपट्टी असलेल्या शिक्षण पद्धती मध्ये बदल करून आवडीच्या क्षेत्रामध्ये करिअर कसे करता येईल असा चांगला संदेश दिला होता. त्यामुळे हा चित्रपट तरुणांसह पालकांमध्ये देखील अत्यंत लोकप्रिय ठरला.
वांगचुक यांच्या लडाख येथील संस्थेला भेट दिल्यानंतर माजी मंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले की, पारंपारिक शिक्षणापेक्षा कौशल्य आधारित शिक्षण देण्यावर आणि विद्यार्थ्याच्या आवडीनुसार शिक्षण देण्यावर शिक्षणतज्ज्ञ वांगचुक यांनी भर दिला आहे. या ठिकाणाहून अनेक शास्त्रज्ञ निर्माण झाले. याचबरोबर लडाख सारख्या दुर्गम प्रदेशांमध्ये वांगचुक यांनी मोठी शैक्षणिक क्रांती घडवली असून त्यांनी विद्यार्थ्याना निसर्गाशी व आनंददायी शिक्षणाची जोडले आहे. आइस स्टूपा या प्रकल्पाने पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी त्यांनी नवा मार्ग दाखवला असून त्यांच्या नावीन्यपूर्ण कामामुळे ते तरुण पिढीचे खरे हिरो ठरले आहेत. विद्यार्थ्यानी आपल्या आवडीचे क्षेत्र निवडून पूर्ण क्षमतेने योगदान दिल्यास त्यांना नक्की यश मिळणार असून कौशल्य आधारित शिक्षण पद्धती अत्यंत गरजेचे असल्याचे ते म्हणाले.
सोनम वांगचुक म्हणाले की, महाराष्ट्र हे प्रगत राज्य आहे. या राज्याचे शिक्षणमंत्री असताना बाळासाहेब थोरात यांनी विविध उपक्रम राबवले. तर, विविध खात्यांच्या मंत्रीमंडळाचा पदभार स्वीकारल्यानंतर आपल्या कामाचा त्याठिकाणी त्यांनी ठसा उमटवला आहे. तसेच पालकांनी मुलांना त्यांच्या आवडीच्या क्षेत्रामध्ये करियर करण्यासाठी प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन केले.
सौ. शरयु देशमुख म्हणाल्या की, सोनम वांगचुक यांची भेट ही संस्मरणीय असून त्यांनी दिलेल्या सूचनांचे जास्तीत जास्त पालन केले जाणार आहे. अमृतवाहिनी शिक्षण संस्थेमध्ये विद्यार्थ्याच्या संशोधन वृत्तीला प्रोत्साहन देण्यासाठी आम्हाला यामुळे प्रेरणा मिळाली असल्याचे देखील त्या म्हणाल्या आहेत.
या भेटी दरम्यान सोनम वांगचुक यांच्या कार्याचे कौतुक करुन सौ. शरयु देशमुख यांनी त्यांना संगमनेरला येण्याचे निमंत्रण दिल्यामुळे लकरचं खरा - खुरा फुनसुक वांगडू ऐकण्याची आणि पाहण्याची संधी संगमनेरकराना मिळणार आहे.
दरम्यान संगमनेर तालुक्यात शिक्षणाचे जाळे निर्माण करणारे महाराष्ट्रातील शिक्षणाचे सह्याद्री बाळासाहेब थोरात यांनी हिमालयाच्या कुशीत शिक्षणाची गंगा घरात - घरात पोहचवत असलेले सोनम वांगचुक यांची भेट घेतल्यानंतर ‘महाराष्ट्राचा सह्याद्री हिमालयाच्या भेटीला’ अशी चर्चा समाज माध्यमात सुरू आहे.