समाज कल्याणच्या प्रदेशाध्यक्षपदी रुपेश म्हात्रे तर उपाध्यक्षपदी डॉ. विश्वास आरोटे
◻️ शिर्डी येथे समाज कल्याण संस्थेची २४ वी वार्षिक सर्वसाधारण सभा आणि पदाधिकारी मेळावा संपन्न
संगमनेर LIVE (शिर्डी) | महाराष्ट्र राज्य समाज कल्याण न्यास या संस्थेच्या प्रांतिक अध्यक्षपदी शिवसेनेचे (शिंदे गट) माजी आमदार रुपेश म्हात्रे यांची प्रदेशाध्यक्षपदी तर प्रदेश उपाध्यक्षपदी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे राज्य सरचिटणीस विश्वास आरोटे यांची निवड करण्यात आली.
तसेच स्वप्निल भोईर, योगेश बेनके, संजीवन म्हात्रे, नारायण पाटील, डाॅ. किशोर बळीराम पाटील, सुधीर जावळे, संजय फुलसुंदर, डाॅ. मनिलाल रतिलाल शिंपी, शंकर खारीक, ज्ञानेश्वर भोईर, विलास भोईर, प्रकाश देवळीकर, मूलचंद भगत, फारुख शेख, समाधान पाटील, नलिनी चौधरी, अजित गायधनी, सौ. गायत्री पगार, राजेंद्र काबाडी, अँड. शुभांगी निचिते, सौ. स्वाती कांबळे, प्रकाश देवळीकर, सौ. नलीनीताई घरत, सौ. अंजलीताई चौधरी आदींचा समावेश असलेली राज्यातील जम्बो कार्यकारणी जाहीर करण्यात आली.
नुकतीच शिर्डी येथे समाज कल्याण या संस्थेची २४ वी वार्षिक सर्वसाधारण सभा व पदाधिकारी मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी हास्य प्रबोधनकार तथा समाज कल्याण न्यास संस्थेचे प्रवक्ते संजीवन म्हात्रे होते. व्यासपीठावर समाज कल्याण न्यास या संस्थेचे संस्थापक डॉ. सोन्या पाटील उपस्थित होते.
अध्यक्षीय भाषणात संजीवन म्हात्रे म्हणाले की, पदे घेऊन ते पदे लग्न पत्रिका व विविध कार्यक्रमांच्या नावासाठी वापर करू नका. संस्थेच्या माध्यमातून ३६५ दिवस समाजसेवा हीच ईश्वर सेवा मानून हा उपक्रम गेल्या २४ वर्षापासून सुरू असल्याचे सांगताना, संस्थेच्या माध्यमातून राबविण्यात येत असलेल्या समाज उपयोगी कामाची माहिती दिली.
डॉ. विश्वास आरोटे बोलताना म्हणाले, समाज कल्याण ही प्रत्येक कार्यकर्त्यासाठी काम करणारी मातृसंस्था आहे. त्यामुळे प्रत्येकाने मिळालेल्या संधीचे सोने करावे आपले विभागांमध्ये सामाजिक कार्यातून या संस्थेची ओळख निर्माण करण्याचे आवाहन केले.
दरम्यान यावेळी दीपक पाटील, गजानन पाटील, साजन भगत, सौ. रजिता दुपारे, विनया कदम, गायत्री पगार, शोभा थोरात, अश्विनी माने, सुनंदा निंबाळकर, कविता सरोदे, ज्योती गोडसे, सिंधूताई पगार, रत्न महाले, सहदेव जाधव, शिल्पा देह्कर, सीमा निचित, रोहिणी फरडे, गायत्री फरडे, वनिता कुरकुटे यासंह राज्यभरातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. तर, या कार्यक्रमाचे आभार संस्थेचे प्रवर्तक जेके पाटील यांनी मानले.