एआय १७१ विमान अपघातातील प्रवाशांच्या नातेवाइकांसाठी मदत कक्ष
◻️ गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्यासह २५० जणाचा विमान अपघात मृत्यू
संगमनेर LIVE (मुंबई) | अहमदाबादहून लंडनकडे जाणाऱ्या एअर इंडिया एआय १७१ या विमानाच्या अपघाताच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाच्या आपत्कालीन संचालन केंद्रामार्फत नागरिकांसाठी मदत व माहिती सेवा उपलब्ध करून देण्यासाठी मदत कक्ष कार्यान्वित करण्यात आला आहे.
या विमान अपघातात प्रभावित झालेल्या प्रवाशांचे नातेवाईक व संबंधित नागरिकांनी आवश्यक माहिती आणि साहाय्यासाठी ०२२-२२०२७९९०, ०२२-२२७९४२२९ भ्रमणध्वनी ९३२१५८७१४३, आपत्कालीन मदत क्रमांक १०७० या हेल्पलाइन क्रमांकांवर संपर्क साधावा, असे आवाहन आपत्ती व्यवस्थापन प्रभागाचे संचालक सतीशकुमार खडके यांनी केले आहे.
दरम्यान या विमान अपघात २५० अधिक लोकांचा मृत्यू झाला असून त्यामध्ये गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचा देखील समावेश आहे. तर, एक प्रवासी चमत्कारिक रित्या वाचला असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.