अमृतवाहिनी महाविद्यालयाच्या राष्ट्रीय स्तरावरील परीक्षेत १८ विद्यार्थ्याचे मोठे यश
◻️ अपेक्षा दिघे हिचा जी पॅट स्पर्धेत देशात ५३ वा क्रमांक
संगमनेर LIVE | उच्च व गुणवत्तेच्या शिक्षणाबरोबर विद्यार्थ्याच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी सातत्याने विविध उपक्रम राबवणाऱ्या अमृतवाहिनी औषध निर्माणशास्त्र महाविद्यालयातील १८ विद्यार्थ्यानी जी - पॅट २०२५ या स्पर्धेत मोठे यश मिळवले आहे. यामध्ये अपेक्षा दिघे हिने या राष्ट्रीय स्पर्धेमध्ये देशातून ५३ वा क्रमांक मिळवला असून यशराज काळे यांनी ६९ वा क्रमांक मिळवत संस्थेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. अशी माहिती प्राचार्य डॉ. मच्छिंद्र चव्हाण यांनी सांगितले आहे.
या परीक्षा व यशाबाबत अधिक माहिती देताना प्राचार्य डॉ. चव्हाण म्हणाले की, माजी मंत्री बाळासाहेब थोरात, आमदार डॉ. सुधीर तांबे व संस्थेच्या कार्यकारी विश्वस्त सौ. शरयूताई देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली महाविद्यालयाने नॅकचा ए दर्जा मिळवला आहे. याचबरोबर राज्य व राष्ट्रीय पातळीवरील विविध स्पर्धेमध्ये गुणवत्तापूर्ण शिक्षणामुळे महाविद्यालयाचा गौरव झाला आहे.
नुकत्याच जी - पॅट २०२५ ( ग्रॅज्युएट फार्मसी अपडेट टेस्ट ) मध्ये फार्मसीच्या १८ विद्यार्थ्यांनी ये संपादन केले आहे. या परीक्षेत ४८ हजार ६४६ विद्यार्थी बसले होते. यापैकी अपेक्षा दिघे ही ने ५३ वा क्रमांक मिळवला. तर यशराज काळे यांनी ६९ वा क्रमांक मिळवला.
याचबरोबर हर्षल मानकर, यश जाधव, वैष्णवी गोंगे, देवेंद्र भोसे, आकाश दुबे, तुषार ढेरे, साक्षी गुंजाळ, शुभम भगत, विजय दळवी, वैभव नजन, अश्विनी देशमुख, प्रनिषा खेमनर, तेजल कुरकुटे, अविष्कार गायके, सलोनी केदारी, तय्यबा पठाण यांनी यश मिळवले आहे.
तर नायपर जेईई २०२५ या परीक्षेमध्ये अपेक्षा दिघे, यशराज काळे, हर्षल मानकर, यश जाधव यांनी उत्कृष्ट बँक मिळून गुणवत्ता सिद्ध केली आहे.
शैक्षणिक वातावरण सुंदर परिसर विद्यार्थ्यांची राहण्याची चांगली व्यवस्था याचबरोबर गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि संशोधनासाठी प्रोत्साहन यामुळे या विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय स्तरावरील परीक्षांमध्ये यश मिळवले असल्याचे संस्थेच्या कार्यकारी विश्वस्त सौ. शरयू ताई देशमुख यांनी म्हटले आहे.
दरम्यान या सर्व यशस्वी विद्यार्थ्याचे माजी मंत्री बाळासाहेब थोरात, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, संस्थेच्या कार्यकारी विश्वस्त सौ. शरयूताई देशमुख, मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल शिंदे, डॉ. जे. बी. गुरव, प्रा. व्हि. बी. धुमाळ, प्राचार्य डॉ. मच्छिंद्र चव्हाण यांनी अभिनंदन केले आहे.