माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या सूचनेनंतर शेतकऱ्यांसाठी यूरिया उपलब्ध
◻️ तालुक्यातील शेतकऱ्यांना यूरिया उपलब्ध व्हावी यासाठी देण्यासाठी केला होता पाठपुरावा
संगमनेर LIVE | सध्या खरीप हंगाम सुरू झाला असून तालुक्यातील बहुतांश पेरणी पूर्ण झाली आहे. मात्र, शेतकऱ्यांना यूरियाची मोठी अडचण निर्माण झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना तातडीने युरिया उपलब्ध करून देण्याबाबत माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी प्रशासनाला सूचना दिल्या होत्या. यानंतर आज कृषि विभागाकडून शेतकऱ्यांसाठी यूरिया उपलब्ध करून देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
संगमनेर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या मागणीवरून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी प्रशासनाला बफर स्टॉक मधील ५० टक्के यूरिया तातडीने शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्याबाबतच्या सूचना दिल्या होत्या. शेतकरी हा जगाचा पोशिंदा असून त्याला सरकारने सातत्याने मदत केली पाहिजे. ही भूमिका मांडली.
शेतकऱ्यांना आसमानी आणि सुलतानी अशा दोन्ही संकटांना सामोरे जावे लागत असून अनेकदा चांगली पिके असूनही भाव मिळत नाही. शासनाने हमीभाव जाहीर करू असे अनेकदा सांगितले मात्र हमीभाव दिलेला नाही. शेतकरी हा कायम संकटात आहे. त्याला शासनाने मदत केली पाहिजे, ही भूमिका बाळासाहेब थोरात यांनी घेतली आहे. याचबरोबर महायुती सरकारने शेतकऱ्यांची कर्जमाफी करणार अशी घोषणा केली होती. ती कर्जमाफी ही तातडीने करावी अशी मागणी त्यांनी केली.
तालुक्यातील शेतकऱ्यांना यूरिया उपलब्ध करून देण्यासाठी थोरात यांचा पाठपुरावा सुरू होता. अखेर कृषि विभागाने शेतकऱ्यांना यूरिया उपलब्ध करुन देण्याच्या सूचना दिल्या. त्यामुळे शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.
बाळासाहेब थोरात यांनी कृषिमंत्री असताना शेतकऱ्यांसाठी महापिक अभियान, १ लाख शेततळी, विद्यापीठे बांधावर अशा अनेक लोकप्रिय योजना राबविल्या. महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळामध्ये शेतकऱ्यांना दोन लाखापर्यंतची विन अट कर्जमाफी देण्यासाठी थोरात यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. अशा भावना खांडगाव येथील प्रगतशील शेतकरी रमेश गुंजाळ यांनी व्यक्त केल्या.