संगमनेर ते पंढरपूर पायी दिंडी सोहळ्यात हजारो भाविक सहभागी
◻️ दिंडीचे ११ वेळ वर्ष ; तालुक्यातून हजारो वारकरी पंढरपूरच्या दिशेने रवाना
संगमनेर LIVE | वारकरी सेवाभावी मंडळ व सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात वारकरी मंच आणि जय हिंद युवा मंच संचलित श्री सोमेश्वर पायी दिंडीचे गुरुवार दिनांक १९ जून २०२५ रोजी श्री क्षेत्र पंढरपूर कडे प्रस्थान झाले असून यात तालुक्यातील हजारो भाविक सहभागी झाले असल्याची माहिती दिंडी संयोजक हभप जालिंदर ढोकरट यांनी दिली.
याविषयी अधिक माहिती देताना ते म्हणाले की, लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली वारकरी सेवाभावी मंडळ, सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात वारकरी मंच आणि जय हिंद युवा मंच संचलित सोमेश्वर पायी दिंडी सोहळ्याचे हे ११ वे वर्ष आहे. हि दिंडी श्री क्षेत्र पंढरपूरकडे गुरुवार दिनांक १९ जून २०२५ रोजी निघाली आहे. सर्वजण विठ्ठलाच्या दर्शनासाठी आतुर असतात. या दिंडीच्या माध्यमातून एकत्र आलेले सर्व भाविक परस्परांशी बंधू भावाने वागतात. यातून एक वेगळीच अलौकिक अध्यात्मिक ऊर्जा मिळते.
या दिंडीत संगमनेर शहर, संगमनेर खुर्द, रायते, वाघापूर, राहणे मळा, ढोले मळा, सुकेवाडी, कासारवाडी मंगळापुर, खांडगाव, झोळे, गणेशवाडी, कोल्हेवाडी, निंबाळे, समनापुर, कनोली, तळेगाव, वडझरी, हिवरगाव, सावरगाव तळ आदी गावांसह तालुक्यातील वारकरी दरवर्षी मोठ्या संख्येने सहभागी होत असतात.
दरम्यान या दिंडीचे मार्गदर्शक हभप अमृत महाराज जोशी, हभप एस. झेड. देशमुख, हभप वाळीबा महाराज भागवत, दिंडी संयोजक तथा अध्यक्ष हभप जालिंदर ढोकरट, हभप भाऊसाहेब मुंडे व सेक्रेटरी माणिकराव पानगव्हाणे यांच्या मार्गदर्शनाखाली मार्गक्रमण करीत आहे.