◻️ संशयिताना जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार घेण्याचा दिला सल्ला
संगमनेर LIVE (आश्वी) | महाराष्ट्र शासनाचा वतीने राष्ट्रीय असंसर्गजन्य कार्यक्रमाअंतर्गत संगमनेर तालुक्यातील निमगावजाळी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राकडून संशयित कर्करोग रुग्णाची मोफत तपासणी करण्यात आली. यावेळी शासनाच्या वतीने सर्व सेवा सुविधा युक्त कर्करोग मोबाईल व्हॅन तपासणीसाठी उपलब्ध करून दिली होती.
यावेळी संशयित रुग्णाची मुख, स्तन, गर्भाशय याची मोफत कर्करोग तपासणी करुन रुग्णांवर औषधोपचार करण्यात आले. तसेच संशयित रूग्णांना पुढील तपासणीसह जिल्हा सामान्य रुग्णालयात येथे उपचार घेण्याचा सल्ला देण्यात आला. याप्रसंगी स्त्रीरोग तज्ज्ञ छाया लोहारे, दंत चिकित्सक डॉ. यास्मिन शेख यांनी रुग्णांची तपासणी केली.
दरम्यान यावेळी प्राथमिक आरोग्य केंद्र प्रमुख डॉ. तय्यब तांबोळी, डॉ. देविदास चोखर, समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. श्रद्धा पाटील, सचिन गवारे, अविनाश तांबे, डॉ. हेमंत जोंधळे, आरोग्य सहायक राहुल बागुल, आरोग्य सेवक दिपक महाजन, महेश पतंगे, शिमोन नवगिरे, नरेंद्र पोटे, रवींद्र पंडागळे, आरोग्य सेविका शीतल निखाडे, अंजुम पठाण व आशा कर्मचारी उपस्थित होते.