अमृतवाहिनीच्या ४८ विद्यार्थ्याची नामांकित आयटी कंपन्यांमध्ये निवड

संगमनेर Live
0
अमृतवाहिनीच्या ४८ विद्यार्थ्याची नामांकित आयटी कंपन्यांमध्ये निवड

◻️ प्राचार्य डॉ. एम. ए. व्यंकटेश यांची माहिती 

संगमनेर LIVE | अमृतवाहिनी महाविद्यालयातील आयटी विभागातील ४८ विद्यार्थ्याना अंतिम परीक्षेपूर्वी नामांकित आयटी कंपन्यांमध्ये उत्कृष्ट पॅकेजवर निवड झाली असून, यामुळे संस्थेच्या गुणवत्तापूर्ण शैक्षणिक आणि प्लेसमेंट कार्यक्षमतेची पुन्हा एकदा प्रचिती आली आहे अशी माहिती प्राचार्य डॉ. एम. ए. व्यंकटेश यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली.

याविषयी अधिक माहिती देताना ते म्हणाले कि, लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्यां मार्गदर्शनाखाली अमृतवाहिनी महाविद्यालयातील आयटी विभागातील ४८ विद्यार्थ्यांची अंतिम परीक्षेपूर्वी कोग्नीझंट, गोदरेज इन्फोटेक, एलटीआय माइंडट्री, टाटा टेक्नॉलॉजी, इन्फोसिस टेक्नॉलॉजीज्, पायबाय थ्री, चेकमार्कस इंडिया,इगल बाइट सोल्युशन, वेब टेक सोल्यूशन्स,डेलॉइट, टेनेरिटी इंडिया अशा विविध नामांकित कंपन्यांमध्ये थेट निवड झाली आहे. विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे शैक्षणिक वर्ष २०२४-२५ मध्ये, स्वामी महाले, अभिषेक कर्पे, प्राची राहणे या विद्यार्थ्यांना टेनेरिटी इंडिया, चेकमार्कस इंडिया आणि इन्फोसिस या नामांकित कंपन्यांनी अनुक्रमे १० लाख, ७ लाख, ६.२५ लाख पॅकेज दिले आहे.

महाविद्यालय स्तरावर आणि आय टी विभागात नाविन्यपूर्ण तांत्रिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. सॉफ्ट स्किल ट्रेनिंग, इंटर्नशिप आणि कंपनी प्लेसमेंट साठी पूरक प्रशिक्षण, जपान व जर्मन भाषांचे प्रशिक्षण, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय कंपन्यांसाठी लागणारे आणि नॅशनल बोर्ड ऑफ अक्रेडिटेशन, नवी दिल्ली यांनी शिफारस केलेले कौशल्याभिमुख तांत्रिक शिक्षण विद्यार्थ्यांच्या यशासाठी पूरक ठरत आहेत. 

आयआयटी संचालित एनपीटीईएल (राष्ट्रीय तंत्रज्ञान संवर्धित शिक्षण कार्यक्रम) मध्ये सर्टिफिकेशन, कर्नाटक, दिल्ली, तेलंगाना, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, महाराष्ट्र राज्यांमध्ये राष्ट्रीय हॅकेथॉन स्पर्धेमध्ये सहभागासाठी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन, प्लेसमेंटसाठी पूरक गेट-ट्यूटर सॉफ्टवेअर-प्रॅक्टिस टेस्ट तसेच मॅटलॅबचे विशेष ट्रेनिंग यांचे करण्यात आले. यासाठी करिअर डेव्हलपमेंट सेलचे प्रमुख प्रा. प्रवीण वाकचौरे आणि आयटी विभागाचे प्लेसमेंट समन्वयक प्रा. संदेश देशमुख यांनी महत्वाची भूमिका बजावली.

विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल माजी मंत्री बाळासाहेब थोरात, विश्वस्त आ. डॉ. सुधीरजी तांबे, कार्यकारी विश्वस्त मा. शरयू देशमुख, मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल शिंदे, डायरेक्टर अकॅडमिक्स डॉ. जे. बी. गुरव, प्राचार्य डॉ. एम. ए. व्यंकटेश, रजिस्ट्रार प्रा. व्ही. पी. वाघे आणि आयटी विभागप्रमुख डॉ. बायसा गुंजाळ यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले असून त्यांना उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

दर्जेदार उद्योगाभिमुख शिक्षण व आंतरराष्ट्रीय दृष्टीकोन
विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता पूर्ण शिक्षणासाठी प्रोत्साहनपर अमृत मेरीटोरियस स्कॉलरशिप, नामांकित बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली ‘अमृत-एक्स्पो’ सारख्या अभियांत्रिकी प्रकल्प स्पर्धा, ‘मिलाप’ माजी विद्यार्थ्यांचा मेळावा, यासारखे अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम, विद्यार्थ्यांना अद्यावत तंत्रज्ञाना बदल श्रीलंका, जर्मनी येथील तज्ज्ञांचे बहुमोल मार्गदर्शन, विद्यार्थी आणि शिक्षकांच्या आयटी कंपन्यांना प्रत्यक्ष भेटी, अद्यावत तांत्रिक विषयांचे चर्चासत्रे आणि विशेष कार्यशाळांचे आयोजन महाविद्यालयात करण्यात येते.
Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !