वाढत चाललेला सामाजिक भेदभाव चिंताजनक - डॉ. सुधीर तांबे
◻️ देवकौठे येथे माऊली काव्यसंग्रहाचे प्रकाशन
संगमनेर LIVE (तळेगाव दिघे) | वारकरी संप्रदायाने समतेची शिकवण दिली आहे. या परंपरेमध्ये उच्च नीच जातीभेद याला थारा नसून हा मानवतेचा विचार पुढे नेला पाहिजे. मात्र वाढलेली धार्मिकता आणि जातीभेद अत्यंत चिंताजनक असून विचारवंत व सुशिक्षित व्यक्तींनी अधिक समाज प्रबोधन करावे. असे आवाहन माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी केले आहे.
तालुक्यातील देवकवठे येथे प्रा. राजाराम मुंगसे लिखित माऊली या काव्यसंग्रहाचे प्रकाशन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी समवेत सिन्नरचे माजी नगराध्यक्ष विठ्ठल राजे उगले, नारायण वाजे, भारत मुंगसे, श्रीराम मुंगसे, एकनाथ मुंगसे, दिनकर मुंगसे, राजेंद्र कहांडळ, ज्ञानेश्वर मुंगसे, नामदेव कहांडळ, दत्तू मुंगसे, शत्रुघ्न मुंगसे साहेबराव कहांडळ, मच्छिंद्र कहांडळ, नारायण मुंगसे, सुमन डुंबरे, स्वप्निल डुंबरे, कैलास कोकाटे, संजय लहारे विविध मान्यवर उपस्थित होते.
याप्रसंगी बोलताना माजी आमदार डॉ. तांबे म्हणाले की, देवकवठे या गावाने कष्टातून मोठी प्रगती साधली आहे या गावातील युवकांनी वेगवेगळ्या क्षेत्रात आपला नावलौकिक निर्माण केला आहे. प्राध्यापक राजाराम मुंगसे यांनी साहित्य क्षेत्राबरोबर समाजकारणातही मोठे योगदान दिले आहे. आई - वडिलांप्रती आणि गावाप्रती असणारे प्रेम आणि कृतज्ञता त्यांनी वारंवार जपली असून सध्या समाजाला विचारवंतांची गरज आहे.
धार्मिकतेच्या नावावर जातीभेद वाढला असून हा अत्यंत धोकादायक आहे वारकरी संप्रदायाने काय मानवतेचा विचार दिला आहे. शिव, शाहू, फुले, आंबेडकरांचा विचार पुढे नेण्यासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करावे असे आवाहन त्यांनी केले.
प्रा. राजाराम मुंगसे म्हणाले की, आई-वडिलांचा संस्कार ही माझ्यासाठी मोठी शिदोरी आहे. गावाची ओढ ही वेगळीच असून कार्यक्षेत्र सिन्नर जरी असले तरी या तालुक्याचा मोठा अभिमान कायम मला आहे. तालुक्याच्या आणि गावच्या विकासात माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचे मोठे योगदान राहिले आहे. आई प्रतिकृतज्ञता व्यक्त करताना माऊली हा काव्यसंग्रह प्रत्येकाला नक्कीच प्रेरणा देईल असे ते म्हणाले.
यावेळी कवी प्रशांत केंदळे, हर्षद गोळेसर, रवींद्र कांगणे, प्रा. जावेद शेख, प्रवीण जोंधळे, बंटी भागवत, सुदाम खालकर, राजाराम मुंगसे, शरद शेवंते आदींसह विविध मान्यवर उपस्थित होते.
दरम्यान या कार्यक्रमाचे स्वागत राजेंद्र कहांडळ यांनी केले. प्रास्ताविक प्रा. राजाराम मुंगसे यांनी तर, नामदेव कहांडळ यांनी सूत्रसंचालन केले आणि भारत मुंगसे यांनी आभार मानले.