राजापूर येथील साई पालखीचे शिर्डीच्या दिशेने प्रस्थान
◻️ आमदार अमोल खताळ यांच्याकडून स्वागत आणि महाआरती
संगमनेर LIVE | संगमनेर तालुक्यातील राजापूर येथील साईबाबा मंदिराच्या वतीने दर वर्षाप्रमाणे याही वर्षी राजापूर ते शिर्डी अशी पायी दिंडी शिर्डीच्या दिशेने रवाना झाली आहे.
या पायी दिंडीचे समनापुर चौफुली जवळ आमदार अमोल खताळ यांनी स्वागत करून साईबाबांच्या मूर्तीला पुष्पहार अर्पण केला. याप्रसंगी त्यांच्या हस्ते महाआरती देखील करण्यात आली.
दरम्यान यावेळी साईबाबा मंदिराचे बाबू सोनवणे यांनी आमदार अमोल खताळ यांचा सत्कार केला. त्यानंतर पालखी वडगाव पान - निळवंडे - जांभूळवाडी फाट्यामार्गे शिर्डीकडे मार्गस्थ झाली. याप्रसंगी साईभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.