सामाजिक कार्यकर्ते विकास गायकवाड यांचे दातृत्व!
◻️ वडीलांचे छत्र हारपलेल्या मुलीला शालेय गणेश आणि साहित्याची मदत
संगमनेर LIVE | घरची परिस्थिती जेमतेम आणि त्यात वडीलांचे छत्र हारवलेल्या मुलीला शिक्षणासाठी सामाजिक कार्यकर्ते विकास साहेबराव गायकवाड यांनी शालेय गणेश आणि साहित्याची मदत केली आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, संगमनेर तालुक्यातील आश्वी खुर्द येथील दिवंगत आप्पासाहेब घाणे यांची मुलगी ही रयत शिक्षण संस्थेच्या आश्वी इंग्लिश स्कूल येथे शिक्षण घेत आहे. परंतु तिच्या घरची परिस्थिती जेमतेम आहे. त्यामुळे सामाजिक कार्यकर्ते विकास गायकवाड यांनी या मुलीला शालेय गणवेश आणि शैक्षणिक साहित्य देऊन दातृत्व दाखवले. तर, इतरांनी देखील आपल्या परिसरातील शालेय विद्यार्थ्याना शक्य ती मदत करावी असे आवाहन केले.
दरम्यान याप्रसंगी प्राचार्य देवराम वडितके, शिक्षक विकास भडकवाड, गणेश खेमनर, सतीश गायकवाड, राजू पाचर्णे, सुनिता पाचर्णे, सौ. म्हसे आदीसह विद्यार्थ्यीनी उपस्थित होती.