आज २३ जून आंतरराष्ट्रीय विधवा दिन ; दडपलेल्या वेदनेची कहाणी
◻️ जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते हेरंब कुलकर्णी यांचे मदतीचे आवाहन
संगमनेर LIVE | २३ जून हा दिवस आंतरराष्ट्रीय विधवा दिन पाळला जातो. २०११ पासून संयुक्त राष्ट्र संघाने या महिलांच्या वेदनेकडे लक्ष वेधण्यासाठी हा दिवस सुरू केला. जगात २४.५ कोटी विधवा आहेत. त्यातील १७ टक्के विधवा महिला भारतात आहेत.
भारतातील जनगणनेत १९९१ साली विधवांची संख्या २ कोटी ६० लाख,२००१ च्या जनगणनेत ३कोटी ४० लाख व २०११ च्या जनगणनेत ४ कोटी ३० लाख विधवा आहेत. ती संख्या आता ६ते ७ कोटी असू शकते.
महाराष्ट्रात २०११ चे जनगणनेत ही संख्या ४५ लाख होती. अहिल्यानगर जिल्ह्याने फक्त ग्रामीण भागात ग्रामपंचायत क्षेत्रात सर्वेक्षण केली तर, विधवांची संख्या ८७ हजार होती. याचा अर्थ शहरी भागासह ती दोन लाख होईल. ३६ जिल्हे आणि मुंबई सारखे महानगर बघता ही संख्या ८० लाखापेक्षा जास्त असू शकते.
या महिलांची दयनीय स्थिती वृंदावन येथे असते पण ग्रामीण विधवा यांचे जगणे अत्यंत वेदनादायक असते. फारसे शिक्षण न होता.या महिलांचे बालविवाह होतात. जगाचा काहीच अनुभव नसतो. अशा स्थितीत जर ती विधवा झाली तर ती स्वतः चे पायावर उभी नसल्याने आणि पदरी लहान मुले असताना धड जगू शकत नाही. सासरची लोक तिला तिचा मालमत्तेचा अधिकार मिळवू देत नाहीत आणि माहेरचे लोक पाठीशी उभे नसतात. पुरुष सहानुभूती देऊन गैरफायदा घेतात. साधे रेशनकार्ड काढणे तिच्यासाठी अत्यंत कठीण असते. मिळेल ते काम करणे आणि मजुरी करणे इतकेच ती करते.
१८५५ पासून पुनर्विवाह चळवळ सुरू झाली पण अजूनही या मुली पदरात मुले आहेत म्हणून पुनर्विवाह करू शकत नाहीत. या महिलांना जेव्हा आम्ही भेटतो तेव्हा विलक्षण उदासी येते. आपण अगतिक आहोत असेच वाटत राहते. सरकार समाज अजूनही पुरेसा या महिलांच्या प्रश्नावर संवेदनशील नाही. या महिलांचे तातडीने सर्वेक्षण करून या महिलांसाठी स्वतंत्र धोरण जाहीर व्हायला हवे. त्यांच्या रोजगारासाठी योजना बनणे आवश्यक आहे. आज आम्ही महाराष्ट्रातील २० जिल्ह्यातील ८० तालुक्यात या महिलांचे संघटन करत आहोत. कोणतीही आर्थिक मदत नसताना माझे सहकारी या महिलाना आधार देत आहेत.
आपल्याला विनंती इतकीच की या विधवा दिनानिमित्त या विधवांच्या मुलांच्या शिक्षणासाठी मदत करा. शाळा उघडल्या आहेत, आम्ही तुमची मदत योग्य विद्यार्थ्यांपर्यंत नक्की पोहोच करू. आमच्याकडे या महिलांचे असे गरजू विद्यार्थी ४००० आहेत.
⏩ १ ली ते ४ थी - २००० रूपये,
⏩ ५ वी ते १० वी - ३०००रूपये,
⏩ ११ वी १२ वी - ५००० रूपये
अशा मदतीची गरज आहे. आपण ही मदत विधवा दिनानिमित्त जरूर पाठवावी अशी विनंती जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि साऊ एकल महिला समितीचे राज्य निमंत्रक हेरंब कुलकर्णी यांनी केले आहे.
बँक अकाउंट नबंर -
Sau Trust
Bank of Maharashtra
Branch - Akole
Dist.- A.Nagar
A/C No.60477125259
IFSC - MAHB0001641
किंवा
गुगल पे व फोन पे :- 8208589195