आश्वी खुर्द महाविद्यालयात योग दिन उत्साहात साजरा
◻️ निरोगी व आनंदमयी जीवन जगण्यासाठी योगसाधना गरजेची - प्राचार्य देविदास दाभाडे
◻️ शेकडो विद्यार्थ्यासह मान्यवरांनी उत्स्फूर्तपणे नोंदवला सहभाग
संगमनेर LIVE (आश्वी) | महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री तथा पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्था नाविन्यपूर्ण शिक्षण आणि उपक्रमासाठी अग्रगण्य राहिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त संगमनेर तालुक्यातील आश्वी खुर्द येथील महाविद्यालयात योग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
यासाठी प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुष्मिता विखे पाटील यांच्या पुढाकारातून आश्वी खुर्द येथील कला, वाणिज्य, विज्ञान व संगणकशास्त्र महाविद्यालय आणि कर्मवीर भाऊराव पाटील विद्यानिकेतन माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात ‘आंतरराष्ट्रीय योग दिना’निमित्त योगासने पार पडली आहेत.
योगसाधने पूर्वी पद्मश्री डॉ विठ्ठलराव विखे पाटील व पद्मभूषण मा. खा. डॉ. बाळासाहेब विखे पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर महाविद्यालयाचे प्राचार्य देविदास दाभाडे मार्गदर्शन करताना म्हणाले की, “निरोगी व आनंदमयी जीवन जगण्यासाठी योगसाधना हा मानवाच्या जीवनाचा अविभाज्य घटक बनला आहे. प्रत्येकाने आपल्या दैनंदिन जीवनात योगसाधना केली पाहिजे. असे आवाहन केले आहे.
यावेळी योग प्रशिक्षक रसाळ, साईराज औताडे, सार्थक औताडे यांनी योग प्रात्यक्षिके शिकविली. प्राचार्य सयराम शेळके यांनी उपस्थितांचे आभार मानले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ. प्रमोद विखे यांनी विशेष परिश्रम घेतले. प्रा. प्राजक्ता खळदकर व प्रा. गौरी क्षीरसागर यांनी सूत्रसंचालन केले.
दरम्यान या प्रसंगी प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे संचालक भाऊसाहेब जऱ्हाड, ट्रॅक वाहतूक सोसायटी संचालक भगवानराव इलग, निवृत्ती सांगळे, गोकुळ दिघे, सौ. कांचनताई मांढरे, उपसरपंच बाबासाहेब भवर, ग्रामपंचायत सदस्य संजय भोसले, दीपक सोनवणे आदींनी योगसाधनेत उत्स्फूर्त सहभाग नोंदवला .