◻️ कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे शिक्षणात मोठे बदल होणार - प्राचार्य वडितके
संगमनेर LIVE (आश्वी) | दिवसे - दिवस समाजामध्ये तसेच शिक्षण प्रणालीमध्ये मोठे बदल होत आहेत. जग आता कृत्रिम बुध्दिमत्ता म्हणजेच ‘एआय’कडे वळाले आहे. हे नविन बदल स्विकारून पालक आणि शिक्षकांनी काळानुरूप पुढे जावे. असे आवाहन प्राचार्य देवराम वडितके यांनी केले.
संगमनेर तालुक्यातील आश्वी येथील रयत शिक्षण संस्थेच्या आश्वी इंग्लिश स्कुल व कनिष्ठ महाविद्यालयात इयत्ता ५ वी ते इयत्ता १० वी च्या शिक्षक आणि विद्यार्थ्याच्या पालकाचा मेळावा नुकताच मोठ्या उत्साहात पार पडला. याप्रसंगी मार्गदर्शन करतांना प्राचार्य वडितके बोलत होते.
या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी शाळा व्यवस्थापण समितीचे ज्येष्ठ सदस्य बाळकृष्ण होडगर होते. सुमतीलाल गांधी, पर्यवेक्षक दीपक चव्हाण, रमेश थेटे, गुरुकुल प्रकल्प प्रमुख मोहन घिगे, सुवर्णा वाकचौरे, पत्रकार वैभव ताजणे यांच्यासह पालक आणि शिक्षक मोठ्या संख्येने यावेळी उपस्थितीत होते.
प्राचार्य वडितके पुढे म्हणाले की, संस्थेच्या नवीन धोरणामुळे शिक्षणाच्या दर्जा दिवसे - दिवस सुधारत असल्यामुळे यंदा पाचवीसाठी १२० विद्यार्थ्याची विक्रमी नोंदणी झाली आहे. याठिकाणी मराठी माध्यमाबरोबर गुरूकुल म्हणजे सेमी इंग्लिश माध्यमातून देखील शिक्षण दिले जात असल्याचे सांगितले.
दरम्यान या मेळाव्याचे सुत्रसंचालन अनिता गाडे यांनी केले.
विद्यार्थ्याचा सर्वागीण विकास व्हावा, हा या पालक मेळाव्याचा मुख्य उद्देश आहे. विद्यार्थी पालक व शिक्षक हे त्रिकोणाचे तीन बिंदु आहे. हे तिन्ही बिंदु एकत्र आल्यानंतर विद्यार्थीचा खरा विकास होईल. असे पर्यवेक्षक दीपक चव्हाण यांनी म्हटले.
कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) ही संगणक प्रणाली प्रमाणे मानवी बुध्दिला कार्ये करण्याची क्षमता देते. यामध्ये शिकणे, तर्क करणे, समस्या सोडवणे, नैसर्गिक भाषा समजून घेणे आणि नवीन माहितीशी जुळवून घेणे यासारख्या गोष्टींचा समावेश आहे. अशी माहिती कृत्रिम बुध्दिमत्ता विभाग प्रमुख बी. एस. सहाणे यांनी दिली.