शहीद मेजर संदीप घोडेकर यांचे नाव हेल्थक्लब रस्त्याला देणार - आमदार अमोल खताळ
◻️ शहीद मेजर घोडेकर यांच्या कुटुंबियांची आमदार खताळ यांनी केले सांत्वन
संगमनेर LIVE | वीरजवान मेजर संदीप घोडेकर यांच्या स्मृती कायमस्वरूपी जागृत राहाव्यात म्हणून हेल्थ क्लब घोडेकरमळा रस्त्याला मेजर संदीप घोडेकर याचे नाव देऊन हेल्थ क्लब रोड प्रवेशद्वाराजवळ कमान उभारावी. अशी मागणी घोडेकरमळा मित्र परिवाराने आमदार अमोल खताळ यांच्याकडे केली आहे. त्यावर योग्य तो निर्णय घेऊ, अशी ग्वाही आमदार अमोल खताळ यांनी दिली.
दिल्ली येथे केंद्रिय गुप्तचर विभागात कार्यरत असताना संगमनेर येथील भूमिपुत्र वीर जवान मेजर संदीप किसन घोडेकर यांचे निधन झाले. मुंबई येथून आल्यानंतर आमदार अमोल खताळ यांनी त्यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांचे बंधू गणेश घोडेकर यांच्यासह कुटुंबियांचे सांत्वन केले.
मेजर संदीप घोडेकर यांनी छत्तीसगड सारख्या नक्षलग्रस्त भागात भागात अनेक वर्षे सीआरपीएफ मध्ये कार्यरत राहून देशसेवा केली आहे. त्यांच्या शौर्याचा आणि कर्तव्य निष्ठेचा आम्हा संगमनेरकरांना अभिमान आहे. अचानक त्यांचे आपल्यातून निघून जाणं हे अत्यंत दुःखद आहे. मी आणि संपूर्ण संगमनेरक घोडेकर कुटुंबियांच्या पाठीशी उभे राहणार आहोत अशा भावना आमदार खताळ यांनी यावेळी व्यक्त केल्या.
दरम्यान याप्रसंगी घोडेकर मळा आणि परिसरातील नागरीकासह महायुतीचे प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी सर्वानी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.