निझर्णेश्वर परीसराचे वैभव वाढविण्यासाठी सहकार्य करणार - मंत्री विखे पाटील
◻️ पालकमंत्री विखे पाटील आणि सौ. शालिनी विखे पाटील यांनी श्री क्षेत्र निझर्णेश्वर येथे केला अभिषेक
संगमनेर LIVE | तिर्थक्षेत्र आणि निसर्ग पर्यटनातून श्रीक्षेत्र निझर्णेश्वर देवस्थानच्या विकासाला नेहमीच प्राधान्य दिले आहे. पर्यटक आणि भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेवून या परीसराचे वैभव अधिक वाढविण्यासाठी सर्व सहकार्य करु. अशी ग्वाही जलसंपदा तथा पालक मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली.
श्रावण महीन्याच्या निमिताने मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि सौ. शालिनी विखे पाटील यांनी श्री क्षेत्र निझर्णेश्वर येथे येवून अभिषेक केला आणि दर्शन घेतले. मंगलमय पर्वाच्या त्यांनी सर्वाना शुभेच्छा दिल्या. मंदीराच्या विश्वस्त समितीच्या वतीने मच्छीद्र थेटे यांनी त्यांचे स्वागत केले.
निझर्णेश्वरचे तिर्थस्थान जागृत देवस्थान म्हणून ओळखले जाते. जिल्ह्यातून भाविक येथे केवळ श्रावण महीन्यातच नाही तर, आता निसर्ग पर्यटन म्हणून देखील येत आहेत. या परिसराच्या विकासासाठी कधीही निधीची कमतरता भासू दिली नाही. भविष्यात या परीसराला पाणी उपलब्ध करून देण्यासाठी वन तळयाचा प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना त्यांनी वन विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या.
पाणी उपलब्ध झाल्यास इथली वनराई अधिक वाढेल आणि निसर्ग पर्यटनाला त्याची मदत होईल. दूधेश्वर डोंगरावराही वन विभागाने निसर्ग पर्यटन निर्माण करण्याच्या दृष्टीने आराखडा तयारा करावा, त्यालाही निधी उपलब्ध करून देण्याची ग्वाही मंत्री विखे पाटील यांनी दिली.
दरम्यान श्रावण महीन्याच्या निमिताने होणारी गर्दी लक्षात घेवून या परीसररात संरक्षण व्यवस्था चोखपणे बजावण्याच्या सूचना त्यांनी पोलीस प्रशसानाला दिल्या.