राजहंस दूध संघाच्या संचालक पदी रमेश गुंजाळ यांची निवड
◻️ माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केला त्यांचा सत्कार
संगमनेर LIVE | ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली सहकार क्षेत्रातील राज्यात अग्रगण्य असणाऱ्या संगमनेर तालुका सहकारी दूध उत्पादक संघाच्या संचालक पदी खांडगाव येथील युवक कार्यकर्ते रमेश लहानभाऊ गुंजाळ यांची बिनविरोध निवड झाली आहे.
राजहंस दूध संघ येथे बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत नुकतीच बैठक झाली. यावेळी उपनिबंधक संतोष कोरे यांच्या अध्यक्षतेखाली संगमनेर तालुका सहकारी दुध उत्पादक व प्रक्रिया संघाच्या संचालक मंडळाचे रिक्त असलेल्या जागी रमेश लहानभाऊ गुंजाळ यांची निवड करण्यात आली.
यावेळी चेअरमन रणजितसिंह देशमुख, व्हा. चेअरमन राजेंद्र चकोर, ज्येष्ठ संचालक लक्ष्मणराव कुटे, युवक काँग्रेस अध्यक्ष डॉ. जयश्रीताई थोरात, विलासराव वर्पे, संतोष मांडेकर, विलास कवडे, विक्रम थोरात, भारत शेठ मुंगसे, विष्णू ढोले, संजय पोकळे, आर. बी. राहणे, भास्करराव सिनारे, बादशहा वाळुंज, बबन कुऱ्हाडे, तुकाराम दातीर, रवींद्र रोहम, डॉ. प्रमोद पावसे, प्रतिभा जोंधळे, मंदा नवले, कार्यकारी संचालक डॉ. सुजित खिलारी आदींसह विविध पदाधिकारी उपस्थित होते.
याप्रसंगी बोलताना बाळासाहेब थोरात म्हणाले की, संगमनेर तालुक्यात दररोज नऊ लाख लिटर दूध उत्पादन होत असून त्यामधून शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये मोठी आर्थिक समृद्धी निर्माण झाली आहे. दूध हा तालुक्याचा मुख्य व्यवसाय झाला आहे. दूध व ऊस हे शाश्वत उत्पन्न असून संगमनेर तालुका दूध संघाने सातत्याने शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये आनंद निर्माण केला आहे. दुग्ध वाढीसाठी विविध योजना राबवले असून सर्व संचालक मंडळ कार्यक्षमपणे काम करत असून रमेश गुंजाळ हे तरुण उत्साही कार्यकर्ते असून त्यांच्या अनुभवाचा फायदा नक्की होईल असे ते म्हणाले.
दरम्यान गुंजाळ यांच्या या निवडीबद्दल बाळासाहेब थोरात, डॉ. सुधीर तांबे, आमदार सत्यजित तांबे, सौ. दुर्गाताई तांबे, इंद्रजीत थोरात, डॉ. जयश्री थोरात, अजय फटांगरे, सोमेश्वर दिवटे, रणजितसिंह देशमुख, सुधाकर जोशी, संपतराव डोंगरे, लहानभाऊ गुंजाळ, आर. बी. रहाणे, पांडुरंग घुले, शंकरराव खेमनर आदी सह अमृत उद्योग समूहातील विविध पदाधिकाऱ्यांनी व तरुण कार्यकर्त्यानी अभिनंदन केले आहे.