सगमनेर तालुक्यातील नऊ जिल्हापरिषद गटाची प्रारुप रचना जाहीर

संगमनेर Live
0
सगमनेर तालुक्यातील नऊ जिल्हापरिषद गटाची प्रारुप रचना जाहीर

◻️ २१ जुलैपर्यत हरकती दाखल करण्यास मुदत

संगमनेर LIVE | मागील अनेक वर्षापासून लांबलेल्या जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुक प्रक्रिया सुरू झाली आहे. नुकतीच अहिल्यानगरचे जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी संगमनेर तालुक्यातील नऊ जिल्हा परिषद गट आणि अठरा गणांसाठी प्रारुप प्रभाग रचना जाहीर केली आहे. यावर २१ जुलैपर्यंत हरकती सादर करण्यास मुदतही देण्यात आली आहे. 

त्यानुसार प्रभाग रचनेमध्ये समनापूर गटात निमोण व समनापूर या दोन गणांतील गावे समाविष्ट असून निमोण गणात निमोण, मालदाड, सायखिंडी, पारेगाव बुद्रुक, पळसखेडे, पिंपळे, कहे, सोनेवाडी, काकडवाडी, नान्नज दुमाला आणि समनापूर गणात समनापूर, सुकेवाडी, कुरण, निंभाळे, खांजापूर, पारेगाव खुर्द, सोनोशी या गावांचा समावेश आहे. 

तळेगाव गटात तळेगाव व वडगाव पान या दोन गणांतील गावे समाविष्ट असून तळेगाव गणात तळेगाव (अजमपूर, जुनेगाव, हसनाबाद), चिंचोली गुरव, मिरपूर, लोहारे, कासारे, देवकौठे, तिगाव, वडझरी बुद्रुक, वडझरी खुर्द आणि वडगाव पान गणात वडगाव पान, कोकणगाव (शिवापूर), कौठे कमळेश्वर, निळवंडे, मेंढवण, माळेगाव हवेली, पोखरी हवेली, करुले या गावांचा समावेश आहे. 

आश्‍वी बुद्रुक गटात आश्‍वी बुद्रुक व आश्‍वी खुर्द या दोन गणांतील गावे समाविष्ट असून आश्‍वी बुद्रुक गणात आश्‍वी बुद्रुक, निमगाव जाळी, चिंचपूर बुद्रुक (चिंचपूर खुर्द), प्रतापपूर, सादतपूर, कोंची (मांची), औरंगपूर आणि आश्‍वी खुर्द गणात आश्‍वी खुर्द, पिंप्री - लौकी अजमपूर, शिबलापूर, खळी, चणेगाव, दाढ खुर्द, झरेकाठी, शेडगाव या गावांचा समावेश आहे. 

जोर्वे गटात जोर्वे व अंभोरे या दोन गणांतील गावे समाविष्ट असून, जोर्वे गणात जोर्वे, कोल्हेवाडी, रहिमपूर, उंबरी बाळापूर, मनोली, ओझर खुर्द, कनकापूर, रायते, वाघापूर आणि अंभोरे गणात अंभोरे, पिंपरणे, कनोली, पानोडी, डिग्रस, मालुंजे, ओझर बुद्रुक, हंगेवाडी, कोळवाडे या गावांचा समावेश आहे. 

घुलेवाडी गटात घुलेवाडी, गुंजाळवाडी व राजापूर या तीन गणांतील गावांचा समावेश असून, घुलेवाडी गणात घुलेवाडी, गुंजाळवाडी गणात गुंजाळवाडी, कासारा दुमाला, वेल्हाळे, ढोलेवाडी ढोलेवाडी आणि राजापूर गणात राजापूर या गावांचा समावेश आहे. 

धांदरफळ बुद्रुक गटात धांदरफळ बुद्रुक या गणातील गावे समाविष्ट असून, धांदरफळ बुद्रुक, धांदरफळ खुर्द (गोडसेवाडी), निमगाव बुद्रुक, चिखली, मंगळापूर, निमगाव खुर्द, कौठे धांदरफळ, सांगवी, जवळे कडलग, वडगाव लांडगा, पिंपळगाव कोंझिरा (कोकणेवाडी), चिकणी, निमगाव भोजापूर या गावांचा समावेश आहे.

संगमनेर खुर्द गटात संगमनेर खुर्द व चंदनापुरी या दोन गणांतील गावे समाविष्ट असून, संगमनेर खुर्द गणात संगमनेर खुर्द, निमज, पेमगिरी, नांदुरी दुमाला, खांडगाव, सावरचोळ (मेंगाळवाडी), शिरसगाव (धुपे), मिर्झापूर, रायतेवाडी आणि चंदनापुरी गणात चंदनापुरी, सावरगाव तळ, हिवरगाव पावसा, झोळे, जाखुरी, निमगाव टेंभी, शिरापूर, रापूर, खराड़ी, देवगाव या गावांचा समावेश आहे. 

बोटा गटात खंदरमाळवाडी व बोटा या दोन गणांतील गावे समाविष्ट असून, खंदरमाळवाडी गणात खंदरमाळवाडी, आंबीखालसा, कौठे बुद्रुक, सारोळे पठार, पोखरी बाळेश्वर, जवळे बाळेश्वर (कौटेवाडी), कौठे खुर्द (खांडगेदरा), सावरगाव घुले, वरुडी पठार, पिंपळगाव माथा, माळेगाव पठार, महालवाडी आणि बोटा गणात बोटा (माळवाडी, केळेवाडी), आंबीदुमाला, म्हसवंडी, कुरकुटवाडी, अकलापूर (आभाळवाडी, शेळकेवाडी), कुरकुंडी, भोजदरी (पेमरेवाडी), वनकुटे, घारगाव, बोरबनवाडी या गावांचा समावेश आहे. 

साकूर गटात पिंपळगाव देपा व साकूर या दोन गणांतील गावे समाविष्ट असून, पिंपळगाव देपा गणात पिंपळगाव देपा (खंडेरायवाडी, मोधळवाडी), वरवंडी (कुंभारवाडी, चौधरवाडी), मांडवे बुद्रुक, खांबे, डोळासणे (बांबळेवाडी), शिंदोडी, कर्जुले पठार (गुंजाळवाडी पठार), खरशिंदे (कणसेवाडी), रणखांबवाडी, कौठे मलकापूर, दरेवाडी आणि साकूर गणात साकूर, जांभूळवाडी, नांदूर खंदरमाळ, जाबुत बुद्रुक (जांबुत खुर्द), हिवरगाव पठार, बिरेवाडी, शेंडेवाडी या गावांचा समावेश आहे. 

दरम्यान या रचनेवर २१ जुलैपर्यंत जिल्हाधिकाऱ्यांकडे हरकती सकारण सादर करता येणार आहे. त्यामुळे आता निवडणूक रिंगणात उतरण्यासाठी इच्छुक असलेल्याकडून चाचपणी सुरू झाली आहे.
Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !