घुलेवाडी येथील वसाहतीच्या नूतनीकरण आराखड्याची विखे पाटील यांनी केली पाहाणी
◻️ अनेक वर्षे दुर्लक्षित जलसंपदा विभागाच्या वास्तूचा कायापालट होणार
संगमनेर LIVE | अनेक वर्षे दुर्लक्षित झालेल्या जलसंपदा विभागाच्या घुलेवाडी येथील कार्यालयाला आता नाविन्यता प्राप्त होणार आहे. जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या संकल्पनेतून सिंचन भवन शेतकरी प्रशिक्षण केंद्राची उभारणी करण्याचा निर्णय विभागाने करून त्याची कार्यवाही सुरू केली.
घुलेवाडी येथील जलसपंदा विभागाचे कार्यालय अनेक वर्षे कार्यरत आहे. जुन्या इमारती, नसलेल्या परीपूर्ण सुविधा, अनेक प्रकल्पाचे विभाग एकाच ठिकाणी आणि अधिकारी कर्मचारी यांच्या वसाहतीचे अनेक वर्षे प्रलंबित असलेल्या प्रश्नाच्या सोडवणुकीसाठी जलसंपदा तथा पालक मंत्री ना. विखे पाटील यांनी पुढाकार घेतला आहे.
वसाहतीच्या नूतनीकरणाचा आराखडा तयार करण्यात आला असून, आराखड्याची आणि जागेची पाहाणी मंत्री विखे पाटील यांनी अधिकाऱ्यासमवेत पाहाणी करून याबातच्या मार्गदर्शक सुचना केल्या.
आमदार अमोल खताळ, भाजपाचे श्रीराम गणपुले, सौ. पायल ताजणे, श्रीकांत गोमासे, गुलाबराव भोसले, राष्ट्रवादीचे कपिल पवार, शिवसेनेचे विठ्ठलराव घोरपडे, रामभाऊ राहाणे, डाॅ. अशोक इथापे, आबासाहेब थोरात यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
या परीसरातील कार्यालयाचे नूतीकरण करतानाच एक भव्य अत्याधुनिक शेतकरी ट्रेनिंग सेंटर विकसित करण्याचा निर्णय विभागाने केला आहे. प्रामुख्याने बंदीस्त पाइपलाईन द्वारे पाणी देण्याच्या व्यवस्थेचे मुख्य केंद्र उभारण्याचे नियोजन विभागाचे आहे.
संगमनेर वकील संघाने या परीसारात त्यांच्या संस्थेसाठी जागेची मागणी मंत्री विखे यांच्याकडे केली आहे. कालच्या भेटीत वकील संघाच्या सदस्यांची मंत्र्याची बैठक घेवून विकसित प्रकल्पाची माहीती दिली. न्यायालयाच्या इमारतीसाठी जागा दिली. भविष्यातील तुमच्या प्रकल्पाला सहकार्य करण्याची ग्वाही जलसंपदा मंत्री विखे पाटील यांनी दिली.
दरम्यान यावेळी त्यांनी आमदार अमोल खताळ यांच्या नविन कार्यालयास भेट सदिच्छा भेट दिली.