माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचा वडगाव पान येथील फ्लेक्स फाडला
◻️ कॉग्रेस कार्यकर्त्यामध्ये संतापाची लाट; संगमनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
संगमनेर LIVE | जेष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्या शुभेच्छा फलकाची काही समाजकंटकांनी छेडछाड केल्याने संगमनेर तालुक्यात तीव्र संतापाची लाट निर्माण झाली असून अशा विकृत प्रवृत्ती वेळीच आवर घाला. अशी मागणी तालुका काँग्रेसचे उपाध्यक्ष बाळासाहेब गायकवाड यांनी केली.
तालुक्यातील वडगाव पान येथील टोल नाक्याजवळ असलेल्या महादेव मंदिराजवळ श्रावण मासनिमित्त माजी मंत्री बाळासाहेब थोरात, आमदार सत्यजीत तांबे आणि डॉ. जयश्री थोरात यांच्या शुभेच्छांचा फ्लेक्स लावला आहे. मात्र, श्रावण महिन्याच्या दुसऱ्याचं दिवशी या फ्लेक्सशी छेडछाड करण्यात आली.
ही बातमी वाऱ्यासारखी पसरल्यामुळे तालुक्यातील कॉग्रेस कार्यकर्त्यामध्ये संतापाची लाट निर्माण झाली आहे. यावेळी घटनास्थळी शेकडो कार्यकर्त्यानी जमा होत निषेध नोंदवला. त्याचबरोबर कार्यकर्त्यांनी यशोधन कार्यालयात धाव घेतली. यावेळी आक्रमक झालेल्या कार्यकर्त्याना इंद्रजीत थोरात यांनी शांततेचे आवाहन केले. यानंतर माजी उपसभापती बाळासाहेब गायकवाड यांनी संगमनेर ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
यावेळी ते म्हणाले की, संगमनेर तालुक्याला सुसंस्कृत परंपरा आहे मात्र काही लोकांनी तालुक्याचे वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. जाती जातींमध्ये भांडणे लावली जात आहेत. विकास कामांऐवजी आता जातीभेदाचे राजकारण सुरू झाले आहे. कधीही नव्हती अशांत वातावरण निर्माण झाले आहे. फ्लेक्स छेडछाड करणाऱ्या अशा विकृत प्रवृत्तीवर तातडीने कारवाई करावी, अशी मागणी केली.
यावेळी निलेश थोरात, महेश थोरात, सागर गायकवाड, पोपट थोरात, अनिस तांबोळी, सुनील थोरात, अरुण कुळधरण, नितीन गायकवाड, रोहित गायकवाड, अभिजीत थोरात, गणेश गडगे, गणेश थोरात आदींसह युवक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
समाज माध्यमांवर निषेध..
फ्लेक्स छेडछाडीची बातमी तालुक्यात कळतात समाज माध्यमावर या घटनेचा निषेध करण्यात येत आहे. तालुक्याचे नाव बदनाम करणाऱ्या अशा विकृत लोकांना प्रशासनाने कारवाई करावी. अशी जोरदार मागणी करण्यात येत आहे.