निझर्णेश्वर देवस्थान विकासासाठी सर्वतोपरी मदत करणार - आमदार खताळ
◻️ पहिल्या श्रावण सोमवारनिमित्त आमदार खताळ यांनी सपत्नीक दुग्धाभिषेक केला
संगमनेर LIVE | निझर्णेश्वर देवस्थान परिसराचा सर्वागीण विकास पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या माध्यमातून सुरू आहेच. मात्र, या मतदारसंघाचा लोकप्रतिनिधी म्हणून माझ्याकडून या विकासासाठी भरीव मदत केली जाईल. अशी ग्वाही आमदार अमोल खताळ यांनी दिली.
संगमनेर तालुक्यातील कोकणगाव येथील निझर्णेश्वर महादेव मंदिरात श्रावण महिन्यातील पहिल्या सोमवारी भाविकांनी मोठ्या श्रद्धेने दर्शन घेतले. सोमवारी सकाळी आमदार अमोल खताळ यांनी पत्नी नीलम खताळ यांच्या समवेत महादेवाला महादुग्धाभिषेक करून महा आरती केली.असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यावेळी देवस्थान ट्रस्टने आमदार अमोल खताळ यांचा सपत्नीक सत्कार केला. याप्रसंगी मोठ्या संख्येने दर्शनासाठी आलेले शिवभक्त उपस्थित होते.
कोकणगाव येथील निझर्णेश्वर हे जागृत देवस्थान असून, श्रावण महिन्यात येथे मोठ्या प्रमाणात भक्त दर्शनासाठी येत असतात. देवस्थान ट्रस्ट आणि कोकण गावमधील युवकांनी दर्शनासाठी उत्कृष्ट व्यवस्था केली आहे. मतदारसंघाचा लोकप्रतिनिधी म्हणून सर्व शिवभक्ताचे स्वागत करतो. याठिकाणी येणाऱ्या भाविकांच्या सोयीसाठी आणि मंदिर परिसराच्या सर्वागीण विकासासाठी जी काही मदत लागेल ती मदत केली जाईल. अशी ग्वाही आमदार खताळ यांनी भाविकांशी संवाद साधताना दिली.