आमदार सत्यजित तांबे यांची विधिमंडळात दमदार कामगिरी

संगमनेर Live
0
आमदार सत्यजित तांबे यांची विधिमंडळात दमदार कामगिरी

◻️ शेतकरी, शिक्षक, वकील यांच्यासह धोरणात्मक ११४ प्रश्नांची विधानपरिषदेत मांडणी

संगमनेर LIVE | माजी मंत्री बाळासाहेब थोरात व माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली समाजकार्याचे बाळकडू मिळालेल्या आमदार सत्यजीत तांबे यांनी विद्यार्थी दशेपासूनच विद्यार्थी चळवळीमध्ये काम करत आहे. नाशिक पदवीधर मतदार संघाचे प्रतिनिधित्व करताना शिक्षक, बेरोजगार, पदवीधर, डॉक्टर, इंजिनिअर, शेतकरी यांच्यासह समाजातील सर्व घटकांचे विविध प्रश्न पावसाळी अधिवेशनात अत्यंत आग्रहपूर्वक मांडले असून सरकारकडून त्या सर्वांना सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. आगामी काळामध्ये या सर्व प्रश्नांचा आपण पाठपुरावा करू. असे आमदार सत्यजीत तांबे यांनी समाज माध्यमांद्वारे जनतेशी संवाद साधताना सांगितले आहे.

संगमनेर येथे पावसाळी अधिवेशनात केलेल्या कामाची माहिती देताना आमदार सत्यजीत तांबे म्हणाले की, एनएसयुआय या विद्यार्थी चळवळीतून आपण काम करत पुढे आलो. अहिल्यानगर जिल्हा परिषदेचे १० वर्ष सदस्य म्हणून काम करताना विविध योजनांचा पाठपुरावा करून त्या जिल्हा परिषद गटाला मॉडेल बनवण्याचे काम केले. डॉ. सुधीर तांबे यांनी उत्तर महाराष्ट्रात निर्माण केलेला जिव्हाळ्याचा परिवार, मतदारसंघाची बांधणी या माध्यमातून या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली. आपण कायम कामाला प्राधान्य दिले असून जनतेचे सर्वसामान्य प्रश्न सोडवण्यासाठी मी कटिबद्ध राहिलो आहे.

या पावसाळी अधिवेशनामध्ये माझी शंभर टक्के उपस्थिती राहिली असून ५२ तारांकित प्रश्न उपस्थित केले. त्यापैकी ४० प्रश्न स्वीकृत झाले होते. ही सर्व प्रश्न अधिवेशनाच्या अगोदर ऑनलाईन पद्धतीने द्यावे लागतात. आणि लॉटरी पद्धतीने त्याची निवड होती याचबरोबर अधिवेशन काळामध्ये ११ लक्षवेधी सूचना आपण मांडल्या.

याचबरोबर सर्व सरकारी कर्मचाऱ्यांना कॅशलेस मेडिकल सुविधा मिळावी याकरताची प्रभावी मागणी केली असून याकरता समिती स्थापन झाली आहे.याच बरोबर अर्धा तास होणाऱ्या चर्चेमध्ये ४ विषय मी मांडले. यामध्ये शेतकऱ्यांचा कांदा प्रश्न हा अत्यंत महत्त्वाचा असून यावर पणन मंत्री जयकुमार रावल यांनी अत्यंत सकारात्मक भूमिका घेतली आहे.

प्रश्नांवरून उद्भवलेले चर्चेवर ५ विषय मी मांडले त्याचबरोबर ५ अशासकीय ठराव विधान परिषदेत मांडले. विधिमंडळ हे कायदेमंडळ असून कायदे बनवण्याचे काम करते. आणि प्रशासन त्याची अंमलबजावणी करते. खाजगी विधेयकामध्ये भावी पिढ्यांचा शाश्वत विकासयावर कायदा करावा अशी आपण मागणी केली. याचबरोबर १४ औचित त्याचे मुद्दे उपस्थित केले. ९३ अन्वये ४ विशेष सूचना मांडल्या. तर पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशन मध्ये १२ सूचना सूचना मांडून सरकारचे लक्ष वेधले आहे आहे.

शेतकऱ्यांचे मोठे बिकट प्रश्न आहे. पदवीधर युवकांचा रोजगारीचा प्रश्न आहे. शिक्षकांचे प्रश्न आहेत, वकील बांधवांना संरक्षण द्यावा या कायद्याकडे आपण लक्ष वेधले त्याचबरोबर आदिवासी आणि झोपडपट्टी विभागांमध्ये अनेक बोगस डॉक्टर कार्यरत असून ते सर्वसामान्य जनतेच्या आरोग्याशी खेळत आहेत. याबाबतचा प्रश्नही आपण मांडला आहे.

वैज्ञानिक विकास महामंडळ हे अनुशेष भरून काढण्यासाठी असून याबाबत विशेष मुद्दा आपण मांडला असून शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये अनेक अडचणी आहेत. याचबरोबर शेततळ्यांमध्ये लहान मुले आणि जनावरे यांचे मृत्यूचे प्रमाण जास्त असून शेततळ्यांना कंपाउंड करण्याकरता अनुदान मिळावी. अशी आग्रही मागणी आपण केली यालाही सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. त्याचबरोबर बिबट्यांची हल्ले, वीज दरवाढ यावरही चर्चा घडवून आणली आहे.

छत्रपती शिवाजी महाराज हे देशाचे आराध्य दैवत आहे आणि त्यांचा इतिहास सीबीएससी पॅटर्न मध्ये समावेश करावा ही आपली कायम मागणी राहिली आहे. सीबीएससी पॅटर्न सध्या भारतामध्ये लोकप्रिय असून यामध्ये महाराजांचा इतिहासाचा जास्तीत जास्त संभाव्य झाल्यास हा भारतातील प्रत्येक विद्यार्थ्याला तो प्रेरणादायी ठरणार आहे. सध्या मात्र अवघा ६८ शब्दांचा हा इतिहास सीबीएससी पॅटर्न मध्ये असून त्यामध्ये जास्तीत जास्त समावेश करावा ही मागणी आपण केली आहे. याबाबत सरकार सकारात्मक असून केंद्र सरकारची चर्चा करणार आहे.

राज्यातील शेतकरी, युवक, बेरोजगार, डॉक्टर, वकील, इंजिनिअर, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी, शासकीय कर्मचारी अशा अनेकांचे विविध प्रश्न आपण सातत्याने मांडले आहेत शंभर टक्के उपस्थित राहून विधिमंडळातील प्रश्नांबरोबरच विविध विभागाचे प्रश्न मंत्र्यांच्या करवी मार्गी लागण्याकरता सातत्याने पाठपुरावा केला आहे.

जनतेने दिलेली संधी यामुळे हे काम करण्याची संधी मिळाली असून माजीमंत्री बाळासाहेब थोरात व माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांचा जनतेशी असलेल्या ऋणानुबंध त्यातून मिळालेले जनतेचे प्रेम या जोरावर मिळालेल्या संधीतून सोने करण्याचा आपला प्रयत्न असून आगामी काळामध्ये जे जे प्रश्न विचारले आणि ज्या संदर्भात सकारात्मक उत्तरे मिळाली किंवा काही अडचणी असतील त्याबाबतचा पाठपुरावा आणि बैठका घेण्यासाठी आपला पहिला प्रयत्न राहील आगामी काळातही प्रत्येकाचे प्रश्न सोडवण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचे ते म्हणाले.

नाशिक - पुणे रेल्वेसह ट्राफिकच्या प्रश्नासंदर्भात आवाज..

नाशिक - पुणे रेल्वे हा अत्यंत महत्त्वाच्या विषयाबाबत राज्याचे वरिष्ठ नेते बाळासाहेब थोरात व आपण सातत्याने पाठपुरावा केला असून ट्रॅफिकची समस्याने मेट्रो शहरांमध्ये नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. याचबरोबर संगमनेर शहरांमध्येही ट्रॅफिकचा मोठा प्रश्न निर्माण झाला असून हा प्रश्न सोडवण्याकडे लक्ष वेधले आहे. माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या पाठपुराव्यातून नाशिक पुणे चौपदरी महामार्ग निर्माण झाला आहे. या बरोबर संगमनेर मध्ये विविध योजना राबवण्यासाठी आपण सरकारकडे पाठपुरावा केला असल्याचे आमदार सत्यजीत तांबे यांनी सांगितले आहे.
Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !